शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

बीज रूजलं रूजलं काळया आईच्या उदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:01 IST

वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे .

ठळक मुद्देसमाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुर

वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे .चांगले पीक पाणी येईल अशी आशा शेतकरी वर्गात आहे. बैल जोडीची संख्या कमालीची घटली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीची कामे उरकावली आहेत. वेळेची बचत होत असल्याने ट्रॅक्टरला जास्त प्रमाणात पसंती देण्यात आली आहे. पावसाचा अंदाज घेत गेल्या दोन आठवड्यापासून सुरू झालेली पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या संचारबंदी असल्यामुळे व शाळांना अद्यापही सुट्ट्या असल्यामुळे परिवारातील सर्वच सदस्यांनी शेतहीवर्तत हजेरी लावत पेरणीची कामात सहभाग नोंदविला आहे. गाव शिवारातील पेरणीची व इतर कामे करताना सामाजिक अंतर राखले जात आहे. संचारबंदी नियमांना प्राधान्य देण्यात अग्रेसर ठरले आहेत. कामावर जाताना तोंडाला मास्क लावत तसेच स्करपचा वापर करत काळजी घेतली जात आहे. सध्या मका, बाजरीसह खरीप पिकांची पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. तरी आगाऊ पेरणी करण्यात आलेल्या मका व पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मका पिकाची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात वडनेरसह काटवण परिसरात करण्यात आली आहे. यामुळे मक्याचे क्षेत्र वाढले आहे.पाडळदे परिसरात पेरणीची कामे पूर्णपाडळदे : पाडळदेसह परिसरातील शेरूळ , हिसवाळ, कळवाडी देवघट भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुर केली आहेत. मान्सून पूर्व व मान्सूनचा पाऊस बºयापैकी झाला. परिसरात रोज रिमझिम होत असतो. काल वादळी वाºयासह जोरात पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आठ दिवसापासून थोड्याफार प्रमाणात रोज पाऊस पडतो त्यामुळे पेरणीची कामे सुमारे ९८ टक्के पूर्ण झाली आहेत. आता कोळपणीला सुरु वात होईल. कपाशी, बाजरी ज्वारी व कडधान्य काही प्रमाणात मका इत्यादी पिकांची लागवड करण्यात आली आहे. येथील शेतकरी रोज सकाळी लवकर उठून आपली न्याहारी बांधून शेतामध्ये काम करताना दिसून येतो. सिंचनाची सोय नसल्याने पाहिजे तसं उत्पन्न घेता येत नाही. कारण परिसरातील संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस कधी जास्त कधी कमी कधी अवर्षणग्रस्त अशी परिस्थिती निर्माण होत असते. पाणी पातळीत वाढझालेल्या वादळी वाºयासह पावसामुळे येथील पाण्याची पातळी वाढण्यास चांगली मदत झाली आहे. शेतकरी थोडयाफार प्रमाणात आपल्या शेतीला सिंचन ही करू शकतो. परिसरात पूर्वापार चालत आलेली पद्धतच शेतकरी राबवताना दिसून येतो. त्यामुळे अधिकच कष्ट करावे लागतात. आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे त्यामुळे उत्पन्नात अधिक भर पडू शकते पण तसे करतांना येथील शेतकरी अजून दिसून येत नाही. फक्त १५ ते २० टक्के शेतकरी ठिबकचा वापर करताना दिसून येतो.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस