पेरणीपूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:48 PM2020-07-08T21:48:41+5:302020-07-09T00:29:04+5:30

नाशिक : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणे गरजेचे असून, यामुळे चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो.

Seed germination should be checked before sowing | पेरणीपूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासणे आवश्यक

पेरणीपूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासणे आवश्यक

googlenewsNext

नाशिक : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणे गरजेचे असून, यामुळे चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. घरच्या घरी उगवणक्षमता तपासता येते, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये यावर्षी सोयाबीन उगवले नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पीक विरळ असणे, रोपांची संख्या कमी असणे यामुळे उत्पादनावर परिणाम होत असतो. यासाठी पेरणीपूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासणे महत्त्वाचे आहे.
उगवणक्षमता तपासण्यासाठी बियाणातील न निवडता १०० दाणे घेऊन ते ओल्या कपड्यात, गोणपाटाच्या तुकड्यात किंवा माती असलेल्या कुंडीत टाकावे. त्यातून किती दाणे जोमदार उगवतात त्यावरून उगवणक्षमतेची टक्केवारी ठरवावी. अंकुर फुटलेल्या बियांची संख्या ५० असेल, तर ५० टक्के आणि ती संख्या ८० असेल तर उगवणक्षमता ८० टक्केसमजावी.
बियाणे घरचे असो किंवा कंपनीचे त्याची उगवणक्षमता तपासल्यास एकरी किती बियाणे वापरावे लागेल याचा अंदाज येतो. उगवणक्षमता कमी असेल तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे, अशी माहिती कृषितज्ज्ञ अच्युत जकातदार यांनी दिली.

Web Title: Seed germination should be checked before sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक