पर्यटकांची सुरक्षा ‘सोमेश्वर भरोसे’

By Admin | Updated: July 25, 2016 00:34 IST2016-07-25T00:28:51+5:302016-07-25T00:34:14+5:30

जीवघेणे फोटोसेशन : संरक्षक कठडे नावापुरतेच

Security of tourists 'someswar bharoose' | पर्यटकांची सुरक्षा ‘सोमेश्वर भरोसे’

पर्यटकांची सुरक्षा ‘सोमेश्वर भरोसे’

अझहर शेख  नाशिक
सोमेश्वर धबधबा खळाळून वाहत असल्याने पर्यटकांना मोह आवरणे अवघड होत आहे. धबधब्याचे नयनमनोहारी दृश्य डोळ्यांत साठविताना पर्यटक जीव धोक्यात घालताना दिसून येत आहे. धबधब्याजवळचे संरक्षक कठडे नावापुरतेच उरले आहेत. पर्यटक थेट नदीपात्रात जाऊन फोटोसेशन करत असून, दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा ‘सोमेश्वर भरोसे’च आहे.
पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले आपोआपच सोमेश्वर धबधब्याकडे वळतात. चौथा शनिवार असल्यामुळे शासकीय कार्यालयांपासून तर औद्योगिक क्षेत्र तसेच शाळा, महाविद्यालयांनाही सुटी होती. दुपारनंतर पावसालाही सुरुवात झाल्याने नाशिककर मोठ्या संख्येने धबधबा बघण्यासाठी सोमेश्वरला आले होते. दुपारी चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धबधब्याच्या परिसरात आबालवृद्ध आनंद लुटताना दिसून आले. यावेळी काही तरुण-तरुणींचे समूह सेल्फी काढण्यासाठी कसलीही तमा न बाळगता जीवघेणी कसरत करत होते. काही पर्यटक जेथून धबधबा कोसळत आहे त्याच खडकावर जाऊन सेल्फी घेत होते. खडकावर शेवाळ आल्याने पर्यटकांचा पाय घसरून तोलही जात होता. काही अतिउत्साही तरुण-तरुणी बेभानपणे जिवावर बेतणारे कृत्य करत धबधब्याजवळ जाण्याचे धाडस करताना आढळले. एकीकडे महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने या पर्यटनस्थळावर कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही, तर दुसरीकडे पर्यटकांचा बेभानपणा दुर्घटनेला निमंत्रण देणारा ठरत होता.

Web Title: Security of tourists 'someswar bharoose'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.