शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षिततेची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:34 IST

दिल्लीतील एका शाळेत झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि त्यामुळेच साºयाच शाळांमधील विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या आणि इंटरनॅशल स्कूल म्हणवणाºया शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा देत नाही अशातला भाग नाही. उलट अनेक इंग्रजी शाळांमध्ये सीसीटीव्हीपासून अन्य अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

लोकमत विशेषनाशिक : दिल्लीतील एका शाळेत झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि त्यामुळेच साºयाच शाळांमधील विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या आणि इंटरनॅशल स्कूल म्हणवणाºया शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा देत नाही अशातला भाग नाही. उलट अनेक इंग्रजी शाळांमध्ये सीसीटीव्हीपासून अन्य अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.  दिल्लीतील शाळेच्या निमित्ताने सुरू झालेल्या सुरक्षिततेचा विचार करता सर्वच शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंतित आहेत. काही शाळांमध्ये जाऊन पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेविषयी काय उपाययोजना केल्या याची विचारणा करण्याचे धाडसही केले. तथापि, बहुतांशी शाळा आपल्या स्तरावर उपाययोजना करीत असतात. बहुतांशी शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. बाह्य अभ्यागतांना शाळेत प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पूर्वपरवानगीशिवाय कोणलाही बाहेर मुलांना नेऊ दिले जात नाही. रासबिहारी स्कूलने यासंदर्भात पालकांना पत्र देऊन शाळेत काय सुरक्षा व्यवस्था आहे, याची माहिती दिली आहे तर अनेक शाळांनी पालकांच्या बैठका घेऊन शाळेची सुरक्षाव्यवस्था किती काटेकोर आहे, याबाबत अवगत केले आहे.ही आहे सुरक्षा व्यवस्थाबहुतांशी शाळांनी बसविले सीसीटीव्ही,  बहुतांशी शाळांची बससेवा, खासगी विद्यार्थी वाहतूक करणाºयांची ठेवली जाते माहितीकर्मचाºयांच्या चरित्र दाखले आवश्यक, अनोळखी अभ्यागतांना प्रवेशबंदी,  पालकांची ओळख पटवूनच मुलांना सोडले जाते घरी,  मुलांच्या आरोग्य काळजीसाठी प्राथमिक उपचार कक्ष,  स्वच्छ आणि हायजेनिक स्वच्छतागृहे.रासबिहारी स्कूलमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना असून यासंदर्भात पालकांना पत्र पाठवून अवगत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याशिवाय अन्य व्यक्तीबरोबरच सोडले जात नाही. बससेवेत खास महिला सेवक नियुक्त करण्यात आले आहे. मुलांवर शारीरिक इजासारख्या कोणत्याही दंडात्मक शिक्षा करण्यास मनाई असून त्याचे परीक्षण केले जाते.- श्रीरंग सारडा, विश्वस्त, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलशाळांमध्ये सुरक्षितता राहावी यासाठी भौतिक सुरक्षिततेची साधने आवश्यक आहेत, त्यानुसार आम्ही कार्यवाही करतोच आहे, परंतु मानसिकता महत्त्वाची आहे. गेल्या वीस- पंचवीस वर्षांची शाळेला परंपरा आहे. त्यामुळे येथे काम करणाºया कर्मचाºयांना कुटुंबाचे स्वरूप प्राप्त झाले आहे आणि कुटुंबाचे काम म्हणून जेव्हा कोणीतरी व्यक्ती काम करते, तेव्हा ती चुकीचे काम करूच शकत नाही. आमच्या संस्थेत आया, वाहनचालक, सुरक्षा कर्मचारी अशी सर्व पदे थेट नियुक्त करण्यात आली आहेत. त्याचा लाभच होतो.- रतन लथ, संचालक, फ्रावसी इंटरनॅशनल अकॅडमीआम्ही कोणत्याही दुर्घटनेची वाट न बघता सुरुवातीपासूनच मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले आहे. विशेषत: सीसीटीव्ही कव्हरेज अशाप्रकारचे आहे की, एक इंचही जागा सुटलेली नाही. तक्रार कोणाकडे करायची आहे हे त्याला अवगत असल्याने प्रत्येक मजल्यासाठी नियुक्त प्राधिकृत अधिकाºयाकडे तो नोंद करू शकतो. मुलांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी येणाºया प्रायव्हेट मोटारी या शाळेच्या आतील जागेतच आणल्या जातात आणि तेथून शाळेच्या देखरेखीखाली मुले रवाना होतात. - श्रीकांत शुल्क, अशोका स्कूल