शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२३ गावांची सुरक्षा केवळ ४३ पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:21 IST

एकीकडे तक्रारींचे निराकरणासाठी पारदर्शक कारभार, नव्या योजना, नवे रूप ही संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवत आयएसओ मानांकित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या येथील पोलीस ठाणे परिसरात तक्रारदारांची मात्र नेहमीच रेलचेल असते. मात्र, दुसरीकडे पोलीस ठाण्यात गेल्या ५० वर्षांपासून अपुऱ्या बळामुळे पंचक्रोशीतील २३ गावांची सुरक्षा अवघे ४३ पोलीस कर्मचारी पाहत आहेत.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वाढती गुन्हेगारी रोखताना दमछाक; जादा कामाने मानसिक ताण

पिंपळगाव बसवंत : एकीकडे तक्रारींचे निराकरणासाठी पारदर्शक कारभार, नव्या योजना, नवे रूप ही संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवत आयएसओ मानांकित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या येथील पोलीस ठाणे परिसरात तक्रारदारांची मात्र नेहमीच रेलचेल असते. मात्र, दुसरीकडे पोलीस ठाण्यात गेल्या ५० वर्षांपासून अपुऱ्या बळामुळे पंचक्रोशीतील २३ गावांची सुरक्षा अवघे ४३ पोलीस कर्मचारी पाहत आहेत.पिंपळगाव पोलीस ठाण्यात १९७०पासून मंजूर असलेल्या ५५ पोलीस कर्मचाºयांच्या अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत. कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुट्या व रजा यामुळे प्रत्यक्षात २५ ते ३० कर्मचारीच कामावर हजर असतात. कर्मचारी संख्या कमी असल्याने अनेक कर्मचाºयांना आठ तासापेक्षा जास्त वेळ ड्यूटी बजवावी लागते. सद्यस्थितीत अवघे ४३ पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यात चार पोलीस अधिकारी, ३१ पुरु ष पोलीस कर्मचारी व ८ महिला पोलीस आहेत. पिंपळगाव बसवंत शहर व परिसरातील २३ गावांची लोकसंख्या जवळपास पाच लाखांच्या आसपास आहे. परिसरात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस कर्मचाºयांची मोठी दमछाक होताना दिसून येते. वाढत्या कामामुळे कर्मचाºयांवर मानसिक ताणही पडत आहे.पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरवाडे, रेडगाव, सावरगाव, रानवड, वावी, ठुशी, गोरठाण, नांदूर, पालखेड मिरची, दावचवाडी, लोणवाडी, कारसूळ, नारायण टेंभी, कुंभारी, आहेरगाव, उंबरखेड, मुखेड, अंतरवेली, पाचोरे वणी, बेहेड, साकोरे, शिरसगाव, कोकणगाव, वडाळीनजीक या २३ गावांचा समावेश होतो. २३ गावांची सुरक्षा बघता पोलीस ठाण्यात पुरेशी कर्मचारीसंख्या नसल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. शहरातील चिंचखेड चौफुली परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. परंतु स्थानकात कर्मचारीसंख्या कमी असल्याने पोलीस नेमके कुठे बंदोबस्ताला पाठवायचे हा प्रश्न वरिष्ठ अधिकाºयांना पडतो. त्याचबरोबर पोलीस ठाण्यासाठी एकच वाहन असून, तेसुद्धा धक्कास्टार्ट आहे. त्यामुळे बºयाचदा पोलीसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होतो.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस