अनैतिक संबंधाचे गुपीत उघड झाल्याने बापाने साखरझोपेतच आवळला तरुण मुलाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 06:38 PM2021-01-04T18:38:54+5:302021-01-04T18:45:56+5:30

पहाटेच्या सुमारास निलेश याचा जोरजोराने 'आई-आई' असा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने जयश्री यांनी त्याच्या खोलीत धाव घेतली असता संशयित प्रभाकर हे त्यांच्या हाताने गळा आवळत असल्याचे त्यांना दिसून आले.

The secret of the immoral relationship was revealed and the father strangled the young boy in his sleep | अनैतिक संबंधाचे गुपीत उघड झाल्याने बापाने साखरझोपेतच आवळला तरुण मुलाचा गळा

अनैतिक संबंधाचे गुपीत उघड झाल्याने बापाने साखरझोपेतच आवळला तरुण मुलाचा गळा

Next
ठळक मुद्देपिता-पुत्राच्या नात्याला काळीमा संशयित पित्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : पित्याचे विवाहबाह्य संबंधाचे गुपीत मुलाला माहित झाले आणि पत्याने दीड एकर शेती स्वत:च्या प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने कडाडून विरोधही केला म्हणून मनात राग धरत पोटच्या २८वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून जन्मदात्या पित्याने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे..

याबाबत पोलिसांकडू मिळालेली माहिती अशी, नाशिक पुणे महामार्गावरील जनरल वैद्यनगर परिसरात राहणारे देवळा पशुसंवर्धन दवाखान्यातील पशुवैद्यक संशयित प्रभाकर माळवाड व त्यांचा मुलगा निलेश माळवाड आणि फिर्यादी आई जयश्री यांनी रविवारी (दि.३) रात्री सोबत जेवण केले. यावेळी मुलगा निलेश याने वडिलांना 'पोल्ट्री फार्म सुरु करु द्या' असे सांगितले. यावेळी संशयित प्रभाकर यांनी त्याला दम देत 'तु काही कामाचा नाही, त्यामुळे मी तुला काहीही देणार नाही' असे सांगत खडसावले. यावेळी दोघा पिता-पुत्रांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. जयश्री यांनी मध्यस्तीने त्यांचे भांडण मिटविले. माळवाड दाम्पत्य त्यांच्या खोलीत झोपले व मुलगा नीलेश हा त्याच्या बेडरुममध्ये झोपलेला असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास निलेश याचा जोरजोराने 'आई-आई' असा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने जयश्री यांनी त्याच्या खोलीत धाव घेतली असता संशयित प्रभाकर हे त्यांच्या हाताने गळा आवळत असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता प्रभाकर यांनी स्वत:च्या पत्नीला ढकलून देत नीलेश प्रभाकर माळवाड (२८) यास गळा दाबून त्यास ठार केल्याचे त्याची आई जयश्री यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रभाकर यास अटक केली असून जयश्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
---
 

Web Title: The secret of the immoral relationship was revealed and the father strangled the young boy in his sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.