दुसऱ्या वर्षीही नीट परीक्षा गोंधळात
By Admin | Updated: May 9, 2017 02:27 IST2017-05-09T02:27:20+5:302017-05-09T02:27:30+5:30
नाशिक : गेल्यावर्षी ‘नीट’ सक्तीवरून निर्माण झालेला गोंधळ, यामुळे ही परीक्षा वर्षभर लांबणीवर टाकून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता

दुसऱ्या वर्षीही नीट परीक्षा गोंधळात
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्यावर्षी ‘नीट’ सक्तीवरून निर्माण झालेला गोंधळ, यामुळे ही परीक्षा वर्षभर लांबणीवर टाकून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु या परीक्षेसाठी संपूर्ण वर्षभर तयारी करण्यासाठी वेळ मिळूनही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे परीक्षेच्या काही तास आधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या आयोजकांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सीबीएसई प्रशासनाने परीक्षा केंद्रांच्या पत्त्याविषयी प्रचंड घोळ घातला असून, विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेचे नियम व अन्य माहिती पोहोचविण्यात सीबीएसईला अपयश आले आहे. गेल्यावर्षी एमबीबीएस व बीडीएसच्या प्रवेशासाठी सीईटी की नीट याविषयीच्या प्रचंड गोंधळानंतर खासगी व अभिमत विद्यापीठांचे प्रवेश ‘नीट’नुसार करण्यात आले. त्यामुळे यावर्षी तरी नीट परीक्षा कोणत्याही गोंधळाविना पार पडणे अपेक्षित होते. मात्र सीबीएससीच्या स्थानिक समन्वयकांनी नियोजनात अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे वेगवेगळ्या शाळांच्या पत्त्यांमध्ये घोळ
झाला.
काही परीक्षा कें द्रांचा पत्ता चुकला असल्याचे समन्वयकांच्या लक्षात येणे गरजेचे होते. परंतु संबंधित व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे ऐनवेळी विनाकारण हाल होऊन राज्याच्या वेगवेगळ्या भागातून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता न आल्याने त्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.