प्रीती झिंटाकडून सलग दुसऱ्या वर्षी निऱ्हाळेकरांना टॅँकर

By Admin | Updated: May 10, 2016 00:13 IST2016-05-09T23:04:26+5:302016-05-10T00:13:55+5:30

विहीर खोदकामालाही निधी

For the second year in a row, Preeti Zinta | प्रीती झिंटाकडून सलग दुसऱ्या वर्षी निऱ्हाळेकरांना टॅँकर

प्रीती झिंटाकडून सलग दुसऱ्या वर्षी निऱ्हाळेकरांना टॅँकर

 बाळासाहेब दराडे निऱ्हाळे
४बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री, चित्रपट निर्माती, आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालकीण अशा अनेक आघाड्यांवर नाव कमावलेल्या प्रीती झिंटा यांनी दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळेकरांवरील आपली ‘प्रीती’ यंदाही कायम ठेवली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी झिंटा यांनी निऱ्हाळेकरांना दररोज एक टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे.
४गत पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या निऱ्हाळे परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील सर्व जलस्रोत कोरडे पडले असून, शासनाकडून दररोज तीन टॅँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. तथापि, निऱ्हाळे-फत्तेपूर ही दोन गावे व परिसरातील दहा वस्त्या यांना हे टॅँकर अपुरे पडत आहेत.
४गेल्या वर्षी प्रीती झिंटा यांनी निऱ्हाळेकरांना एप्रिल, मे व जून हे तीन महिने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. यावर्षीही टॅँकरची दररोज एक खेप सुरू केली आहे. या टॅँकरद्वारे निऱ्हाळेतील काजीपुरा, लोहारवाडा, राजवाडा, कोळीवस्ती, इंदिरा आवास कॉलनी आदिंबरोबर वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
 

Web Title: For the second year in a row, Preeti Zinta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.