शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

राज्यात दुसऱ्यांदा आढळला साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ वन्यजीव

By अझहर शेख | Updated: January 6, 2021 02:24 IST

भारतातील गुजरातमध्ये प्रामुख्याने आढळणारा साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ हा वन्यप्राणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रथमच आढळून आला. महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारा हा वन्यप्राणी सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आढळून आला होता. यानंतर पुन्हा शिरपूरमधील एका शेतात अत्यवस्थ अवस्थेत  आढळून आला.

ठळक मुद्देअनेर डॅम अभयारण्यात नोंद : शिरपूरच्या शेतात अतिदुर्मीळ वन्यप्राण्याचा अधिवास, वन्यजीवप्रेमींच्या मदतीने रेस्क्यू

नाशिक : भारतातील गुजरातमध्ये प्रामुख्याने आढळणारा साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ हा वन्यप्राणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रथमच आढळून आला. महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारा हा वन्यप्राणी सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आढळून आला होता. यानंतर पुन्हा शिरपूरमधील एका शेतात अत्यवस्थ अवस्थेत  आढळून आला. या प्राण्याला वन्यजीवप्रेमींच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. साळींदरसारखा दिसणारा भारतीय हेजहॉग वन्यप्राणी महाराष्ट्रात यापूर्वी पुणे, नंदुरबारमध्ये आढळून आल्याचे सांगितले जाते. या वन्यप्राण्याबाबत वनविभागाकडेदेखील फारशी माहिती नाही. आढे गावातील धनंजय मुरलीधर मराठे यांच्या शेतात चारा कापणी सुरू असताना अचानकपणे हा वन्यप्राणी शेतमजुरांना नजरेस पडला. सुरुवातीला शेतमजुरांना हा साळींदरचे (सायाळ) पिल्लू वाटले. हे पिल्लू निपचित पडलेले होते. याबाबत त्यांनी तेथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश बारी यांना कळविले. बारी यांनी घटनास्थळी येऊन बघितले असता त्यांनी त्यास ओळखले.हे साळींदर नसून ‘हेजहॉग’ हे दुर्मीळ वन्यजीव असल्याचे त्यांनी सांगितले. बारी यांनी त्वरित अनेर डॅम वन्यजीव अभयारण्याचे वनक्षेत्रपाल प्रदीप राैंदळ यांना कळविले. रौंदळ यांनी वनरक्षक मनोज पाटील, महेश करणकाळ,  नेचर कॉन्झर्वेशन फोरमचे वन्यजीवप्रेमी अभिजित पाटील यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. बारी यांनी या दुर्मीळ वन्यजीवाला चार दिवस देखभालीखाली ठेवण्यास सांगितले. शिरपूरचे सहायक वनसंरक्षक अमितराज जाधव यांच्या आदेशान्वये वनपाल नितीन बारेकर, पाटील यांनी या अतिदुर्मीळ प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. नाशिक वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेर डॅम वन्यजीव अभयारण्याच्या प्रशासनाकडून या प्राण्याची नोंद करण्यात आली आहेनेचर कॉन्झर्वेशन फोरमकडून सुश्रूषाअशक्तपणा आल्याने या वन्यप्राण्याला त्वरित नैसर्गिक अधिवासात न सोडता रौंदळ यांनी या प्राण्याच्या देखभालीची जबाबदारी फोरमकडे सोपविली. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार दिवस सुश्रुषा केल्यानंतर या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. पुन्हा बारी यांनी त्याला तपासून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यास हिरवा कंदील दिला. अवघे ७०० ग्रॅम वजनशिरपूरमध्ये आढळून आलेल्या या वन्यप्राण्याचे वजन अवघे ७००ग्रॅम इतके होते आणि त्याचे वयदेखील कमी असल्यामुळे त्याला भूक भागविणे अवघड झाल्याने कदाचित त्याला डिहायड्रेशन झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. हा प्राणी प्रामुख्याने लहान पाली, बेडूक, सरडे, साप, गांडूळ खाऊन गुजराण करतो. रात्रीच्या वेळी या प्राण्याची भक्ष्यासाठी हालचाल सुरू असते. हा प्राणी आकाराने लहान असतो..

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव