नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी गुरुवारी (दि.१९) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. यात एकूण ८ हजार ४५७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यातील ३ हजार ३८९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे.अकरावी प्रवेशप्रक्रियेत पहिल्या फेरीनंतर ११ हजार ५०० विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ ५ हजार ४९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर दुसºया गुणवत्ता यादीपूर्वी काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलले आहे. दुसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेशप्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये नियमित वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु, त्यासाठी दुसरी फेरी पूर्ण होईपर्यंत किमान ७० टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दरम्यान, दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असून प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुन्हा प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे अशा सर्व ३ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. दुसºया गुणवत्ता यादीत १ हजार ८४२ विद्यार्थ्यांना दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.दुसºया फेरीचे वेळापत्रक१९ ते २१ जुलै : दुसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश४२३ जुलै : रिक्त जागांचा तपशील४२३ व २४ जुलै : आॅप्शन फॉर्म भरण्याची संधी४२६ जुलै : तिसरी गुणवत्ता यादी
दुसऱ्या फेरीत साडेआठ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:18 IST
नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी गुरुवारी (दि.१९) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. यात एकूण ८ हजार ४५७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यातील ३ हजार ३८९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे.
दुसऱ्या फेरीत साडेआठ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
ठळक मुद्देअकरावी : ३ हजार ३८९ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय