हॉकर्स नोंदणीचा दुसरा टप्पा लवकरच

By Admin | Updated: September 8, 2016 01:16 IST2016-09-08T01:16:07+5:302016-09-08T01:16:23+5:30

महापालिका : हॉकर्स झोनचा पायलट प्रोजेक्ट राबविणार

Second phase of Hawkers Registration soon | हॉकर्स नोंदणीचा दुसरा टप्पा लवकरच

हॉकर्स नोंदणीचा दुसरा टप्पा लवकरच

नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा निश्चित केला असून, ९ हजार ६०० हॉकर्सची नोंदणी करण्यात आली आहे. आता उर्वरित हॉकर्सची नोंदणी करण्यासाठी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा पुढील आठवड्यात राबविण्यात येणार असून, शहरातील मध्यवर्ती भागात पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठीही महापालिकेने तयारी सुरू केली आहे.
महापालिका प्रशासनाने शहर फेरीवाला समितीच्या माध्यमातून हॉकर्स झोनचा आराखडा तयार करून तो महासभेच्या मान्यतेसाठी दोन महिन्यांपूर्वी ठेवला होता. महासभेने सूचना-दुरुस्तीसह त्याला मंजुरी दिली होती. परंतु अजूनही सदस्यांकडून सूचना केल्या जात असल्याने महासभेकडून ठराव प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. दरम्यान, प्रशासनाने शहरातील उर्वरित हॉकर्सचीही नोंदणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरविले असून, सर्व हॉकर्सची नोंदणी झाल्यानंतर त्यांची एकत्रित मतदार यादी तयार केली जाणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार शहर फेरीवाला समितीवर ८ सदस्य हे फेरीवाल्यांमधून निवडायचे आहेत. त्यासाठी फेरीवाल्यांमधूनच मतदानाने त्यांची निवड करायची आहे. यापुढे शहर फेरीवाला समितीवरील सदस्यांची संख्या ३० वरून २० वर आणण्यात आली आहे. हॉकर्स झोनचा आराखडा प्रत्यक्षात राबविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. महासभेचा ठराव प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रारंभी शहराच्या मध्यवर्ती भागात एका ठिकाणी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचीही तयारी महापालिकेने सुरू केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Second phase of Hawkers Registration soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.