ओणे पुलावर सलग दुसरा अपघात
By Admin | Updated: July 31, 2016 22:30 IST2016-07-31T22:28:35+5:302016-07-31T22:30:40+5:30
ओणे पुलावर सलग दुसरा अपघात

ओणे पुलावर सलग दुसरा अपघात
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील ओणे गावाजवळील तीव्र उताराच्या बाणगंगा पुलावर दुसरा ट्रॅक्टर अपघात झाला.नशीब बलवत्तर म्हणून चालकाने नदीत उडी घेतल्याने तो बचावला. ओझर-सुकेणे रस्यावरून ओणे गावाकडून चितेगावकडे शेणखत घेऊन जाणारा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली या उतारावर नदीत कोसळल्या. तीव्र उतारामुळे हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरम्यान, याच पद्धतीचा अपघात काही महिन्यांपूवीॅ झाला होता. त्यात कसबे सुकेणे येथील युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ओणे गावाच्या या पुलाची उंची वाढविण्याची अनेक वर्षांपूवीॅची मागणी आहे. सातत्याने अपघात होत असल्याने ओणे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या ठिकाणी नवा उंच पूल तयार करावा, अशी मागणी सुरेश घुगे, सुभाष हाळदे, दिनकर कातकाडे, सुरेश बोडके, रमेश घुगे, उद्धव पवार यांनी केली आहे.