शिंदे येथे अखंड हरिनाम सप्ताह
By Admin | Updated: November 25, 2015 22:51 IST2015-11-25T22:50:51+5:302015-11-25T22:51:30+5:30
शिंदे येथे अखंड हरिनाम सप्ताह

शिंदे येथे अखंड हरिनाम सप्ताह
सोग्रस : चांदवड तालुक्यातील शिंदे येथील विठ्ठल मंदिरात गुरुवारी
(दि.२६) अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ होत आहे.
सप्ताह कालावधीत दररोज सकाळी ६ वाजता भजन, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ वाजता प्रवचन, हरिपाठ व रात्री ९ वाजता कीर्तन होईल. गुरुवारी (दि.२६) धोंडीराम महाराज, वडाळीभोई यांचे प्रवचन, तर देवराम महाराज गायकवाड, दौंड यांचे कीर्तन होईल. शुक्रवार, दि. २७ रोजी संजय महाराज बोपाणेकर यांचे (प्रवचन), तर तुकाराम महाराज जेऊरकर यांचे कीर्तन, दि. २८ रोजी शिवाजी महाराज भडाणेकर यांचे प्रवचन , ज्ञानसिंधू संदीपन शिंदे यांचे कीर्तन, रविवार, दि. २९ रोजी वामन महाराज काळे यांचे प्रवचन, बाबासाहेब इंगळे, बीड यांचे कीर्तन, सोमवार, दि. ३० रोजी तुकाराम महाराज, परसूल यांचे प्रवचन, सुनील महाराज झांबरे, बीड यांचे कीर्तन, मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ह. भ. प. जयराम महाराज गोंडेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल, भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवराम शिंदे, माधव शिंदे, ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांनी केले आहे. (वार्ताहर )