पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

By Admin | Updated: December 24, 2016 21:07 IST2016-12-24T21:07:30+5:302016-12-24T21:07:30+5:30

भूकंपाचे केंद्रबिंदू असलेलया पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव ,डोल्हार माळ परिसरात पहाटेच्या वेळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकामध्ये एकच धावपळ झाली.

Seasonal earthquake strikes in Peth taluka | पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

ऑनलाइन लोकमत 

पेठ, दि. 24- भूकंपाचे केंद्रबिंदू असलेलया  पेठ तालुक्यातील गोंदे,  भायगाव ,डोल्हार माळ परिसरात पहाटेच्या वेळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकामध्ये एकच धावपळ झाली. शनिवारी पहाटे 2 ते 4वाजे दरम्यान  या परिसरात जामिन हादरल्याचे जाणवले.4ते 5 वेळा भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 
 
या गावातीत घरांच्या कडया वाजल्या तसेच भांडी पडली या प्रकाराने परिसरातील गाव वस्त्यावरील नागरिक घराबाहेर पडले.  धक्का सौम्य असल्याने कुठल्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तीय हानी झाली नाही. या बाबतची खबर पोलीस पाटील यांनी तहसिल प्रशासनास दिल्याने ग्रामसेवक व मंडळ अधिकारी दळवी यांनी घटना स्थळी जाऊन परिस्थीतीची पाहाणी केली.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले. भुकंपाचा धक्का सौम्य असल्याने त्याची नोंद मेरीच्या भुकंपमापन यंत्रावर झाली नसल्याचे सांगण्यात आले.
 
भूकंपमापक यंत्र प्रतिक्षेतच
पेठ तालुक्याच्या गोंदे व भायगांव परिसरात गतवीस वर्षापासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने या भागात भूकंपमापक यंत्र बसवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र शासनदरबारी अद्यापही ही मागणी प्रतिक्षेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Seasonal earthquake strikes in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.