चित्रकारांच्या कॅनव्हासवर उमटल्या साधूंच्या भावमुद्रा

By Admin | Updated: August 2, 2015 00:02 IST2015-08-02T00:01:20+5:302015-08-02T00:02:22+5:30

चित्रकारांच्या कॅनव्हासवर उमटल्या साधूंच्या भावमुद्रा

The seashore of the sadhus of the painters of canvas | चित्रकारांच्या कॅनव्हासवर उमटल्या साधूंच्या भावमुद्रा

चित्रकारांच्या कॅनव्हासवर उमटल्या साधूंच्या भावमुद्रा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाल्याने भाविक, पर्यटक यांच्याप्रमाणेच चित्रकार, छायाचित्रकार आदि कलाकारांनाही साधुग्रामचे आकर्षण वाटत असून, काही हौशी चित्रकार आपल्या कॅनव्हासवर याठिकाणी साधू-महंतांच्या विविध भावमुद्रा टिपण्यासाठी तासन् तास बसत आहेत.
चित्रकला हे कलेचे एक सुंदर आणि उत्कृष्ट माध्यम मानले जाते. हजार शब्दातून जे सांगता येणार नाही ते एका चित्रातील रेषांमधून सांगता येत असते. शहरातील विविध चित्रकला महाविद्यालयांतील कलाशिक्षक आणि फाईन आर्ट या शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रत्यक्ष व्यक्तिचित्रण, वस्तुचित्रण आणि निसर्गचित्र रेखाटण्यासाठी गोदाघाटावर आणि एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातात. परंतु सध्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममध्ये विविध आखाडे आणि खालशांचे आकर्षक मंडप आणि तंबू उभे राहत आहेत. तसेच काही साधू एका पायावर उभे राहून, तर काही उंचावर मचाण उभारून तपसाधना करत आहे. त्याचप्रमाणे त्यांची वेशभूषा, केशभूषा सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळी असल्याने चित्रकार आपल्या कॅनव्हासवर चित्र रेखाटत आहेत.

Web Title: The seashore of the sadhus of the painters of canvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.