स्मार्ट नाशिक अ‍ॅपद्वारे असे शोधा नाव - मतदान केंद्र

By Admin | Updated: February 21, 2017 01:00 IST2017-02-21T00:59:55+5:302017-02-21T01:00:11+5:30

स्मार्ट नाशिक अ‍ॅपद्वारे असे शोधा नाव - मतदान केंद्र

Search through the Smart Nashik app name - polling center | स्मार्ट नाशिक अ‍ॅपद्वारे असे शोधा नाव - मतदान केंद्र

स्मार्ट नाशिक अ‍ॅपद्वारे असे शोधा नाव - मतदान केंद्र

नाशिक : महानगरपालिकेसाठी शंभर टक्के मतदान व्हावे, या उद्देशाने प्रभाग व केंद्राची माहिती नसल्याने मतदानापासून वंचित राहणाऱ्या मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजे आजही आपले नाव व केंद्र शोधता येणार आहे.  महापालिकेचे संकेतस्थळ व अ‍ॅप याच्या मदतीने हे काम करता येणार असून, इच्छुक मतदारांना संकेतस्थळावर तसेच स्मार्ट नाशिक या अ‍ॅपवर ते मिळू शकणार आहे. संकेतस्थळावर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात प्रभाग क्र मांक व नाव टाकल्यास आपले मतदान केंद्र, अनुक्र मांक उपलब्ध होते. यामुळे मतदारांना कॉम्प्युटर तथा स्मार्ट फोनद्वारे आपले नाव व मतदान केंद्र शोधता येईल. पालिकेच्या ‘स्मार्ट नाशिक’ या मोबाइल अ‍ॅपवरदेखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी मतदारांनी गूगल प्ले स्टोअरवरून ‘स्मार्ट नाशिक अ‍ॅप’ डाउनलोड करणे अथवा अपडेट करणे आवश्यक आहे. या कार्यप्रणालीद्वारे मतदारांना आपल्या नावातील काही आद्याक्षरे वापरून किंवा मतदान ओळखपत्र क्र मांक टाकून तत्काळ नाव व मतदान केंद्र शोधता येईल. याप्रमाणे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यास मदत होईल. नावाच्या स्पेलिंगमध्ये गोंधळ असल्याने काही जणांना नाव, आडनाव टाकूनही रिझल्ट मिळत नसेल तर अशांनी आपल्या मतदान ओळखपत्रावरील दहा आकडी नंबर टाकावा. तो टाकल्यानंतर सर्च मारल्यावर निकाल येत आहे. संपूर्ण मतदार सूची ही ३१ प्रभागांमध्ये विभागली जाणार आहे. शोधकर्त्याला अगोदर त्याचे- तिचे प्रभाग निवडण्यास सांगण्यात येईल. जर शोधकर्त्यास प्रभाग क्र मांक माहीत नसेल तर त्यासाठी प्रभाग क्र मांक शोधण्याची माहिती प्रणालीमध्ये असणार आहे. ज्यामध्ये प्रभागाची विस्तृत चतु:सीमा तसेच महत्त्वाची ठिकाणे दर्शवून योग्य प्रभाग क्र मांक निवडता येईल. मतदाराच्या नावापुढे त्याच्या मतदान केंद्राचा पत्ता, वर्णन असेल.

Web Title: Search through the Smart Nashik app name - polling center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.