संमेलनाच्या प्रक्षेपणासाठी प्रायोजकांची शोधाशोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:48+5:302021-02-13T04:15:48+5:30

नाशिक : साहित्य संमेलनाचा आनंद राज्यातील ८ प्रमुख जिल्ह्यांच्या सांस्कृतिक केंद्रांमध्ये भव्य स्क्रीनवर दाखवण्यासह नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांच्या किमान एकेका ...

Search for sponsors for the launch of the convention! | संमेलनाच्या प्रक्षेपणासाठी प्रायोजकांची शोधाशोध !

संमेलनाच्या प्रक्षेपणासाठी प्रायोजकांची शोधाशोध !

नाशिक : साहित्य संमेलनाचा आनंद राज्यातील ८ प्रमुख जिल्ह्यांच्या सांस्कृतिक केंद्रांमध्ये भव्य स्क्रीनवर दाखवण्यासह नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांच्या किमान एकेका कलादालनांमध्ये साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण पोहोचविण्याचा संमेलन आयोजकांचा निर्धार आता काहीसा ढळू लागला आहे. संमेलनाचे प्रमुख खर्चाची पूर्तता करण्यातच दमछाक होत असल्याने या लाईव्ह प्रक्षेपणांसाठी प्रायोजकांची शोधाशोध करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाच्या उपस्थितीवर काहीसे निर्बंध राहणार असून, आसन व्यवस्थादेखील एक आसनाची जागा सोडून होणार आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचा लाईव्ह आनंद राज्यातील अधिकाधिक रसिकांना घेता यावा, यादृष्टीने राज्यातील सर्व विभागांच्या शहरांमधील मुख्य सांस्कृतिक केंद्रांच्या भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण करण्याचा आयोजक लोकहितवादी मंडळाचा मानस संमेलनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत बोलून दाखविण्यात आला होता. त्यानुसार संमेलनाच्या तयारीमध्ये जेव्हा या लाईव्ह प्रक्षेपणांच्या संदर्भात चौकशी करुन खर्चाबाबतची विचारणा करण्यात आली, त्यावेळी हा खर्च अधिक असल्याने त्याबाबत काय निर्णय घ्यायचा, यावर प्रारंभिक स्तरावर विचारविनिमय करण्यात आला. त्यात अत्यावश्यक खर्चाच्या पूर्ततेनंतर निधी शिल्लक राहणार असल्यास या प्रस्तावावर विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काहींनी या प्रक्षेपणासाठी प्रायोजक शोधण्याचा दिलेला सल्ला अखेर मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात त्याबाबत प्रायोजक शोधून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच प्रायोजक न मिळाल्यास पडदे लावून थेट प्रक्षेपणाचा निर्णय बारगळण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.

इन्फो

यु ट्युब, फेसबुक लाईव्हबाबत निश्चिती

लाईव्ह प्रक्षेपण स्क्रीनवर करण्याबाबतचा निर्णय हा प्रायोजकत्वावर अवलंबून असला तरी यु ट्युब, फेसबुक लाईव्हसारख्या समाजमाध्यमांतून प्रक्षेपणाचे लाईव्ह प्रसारण करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देश-विदेशातील मराठीजनांना समाज माध्यमांतूनही संमेलनाचा लाईव्ह आनंद घेता येणार आहे.

लोगो

संमेलनाचा (निर्धारीत) लाेगोच वापरावा.

Web Title: Search for sponsors for the launch of the convention!