नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीचा दिवस अखेरीस पार पडला, त्यामुळे आता मतविभागणी टाळण्यासाठी बंडखोर तसेच अपक्षांची माघारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारपासून (दि.५) उमेदवारांची धावपळ सुरू असून, त्यामुळे अपक्षांनाही ‘भाव’ आला आहे.शुक्रवारी (दि.५) पंधरा मतदारसंघात एकूण २४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात अपक्ष आणि बंडखोरांचा भरणा अधिक होता. शनिवारी छाननीनंतर २१२ उमेदवारांचेच अर्ज शिल्लक राहिले आहेत. तथापि, ज्यांचे अर्ज वैध ठरले आहेत, अशा बंडखोर आणि अपक्षांमुळे प्रमुख पक्षीय उमेदवारांना मतविभागणीचा फटका बसू शकतो. त्यामुळे त्यांना माघारीसाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अपक्षांनी आपण प्रचारात आहोत, नंतर भेटतो असे सांगून अधिकृत उमेदवारांना भेटण्याची टाळाटाळ सुरू केली आहे तर दुसरीकडे अनेकांचा भाव वाढला आहे.
मत विभागणी टाळण्यासाठी अपक्षांची शोधाशोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:22 IST
नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीचा दिवस अखेरीस पार पडला, त्यामुळे आता मतविभागणी टाळण्यासाठी बंडखोर तसेच अपक्षांची माघारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारपासून (दि.५) उमेदवारांची धावपळ सुरू असून, त्यामुळे अपक्षांनाही ‘भाव’ आला आहे.
मत विभागणी टाळण्यासाठी अपक्षांची शोधाशोध सुरू
ठळक मुद्देअधिकृत उमेदवारांना भेटण्याची टाळाटाळ सुरू