बुडालेल्या तरुणाचा शोध थांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:53+5:302021-09-13T04:14:53+5:30

नाशिक: वालदेवी नदीला पूर आलेला असताना पाथर्डी-दाढेगाव पूल ओलांडताना तरुण वाहून गेल्याची घटना पिंपळगाव खांब जवळ शनिवारी सायंकाळच्या ...

The search for the drowned youth stopped | बुडालेल्या तरुणाचा शोध थांबविला

बुडालेल्या तरुणाचा शोध थांबविला

नाशिक: वालदेवी नदीला पूर आलेला असताना पाथर्डी-दाढेगाव पूल ओलांडताना तरुण वाहून गेल्याची घटना पिंपळगाव खांब जवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. आपत्ती विभाग, तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने रविवारी दुपारी तीन वाजेनंतर बचाव कार्य थांबविण्यात आले.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वालदेवी नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे. नदीवर पाथर्डी-दाढेगाव यांना जोडणारा छोटा पूल असून, या पुलावरूनही पाणी जात आहे. वसंत लक्ष्मण गांगुर्डे (४५, रा.पिंपळगाव खांब) हा तरुण कामावरून परतत असतांना असताना, पाय घसरून पाण्यात पडल्याचे बोलले जात आहे. याबाबत स्थानिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भ्रमणध्वनीवरून माहिती कळविली असता, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, तसेच अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले. त्यांनी रबरी बोट, लाइफ जॅकेटच्या साह्याने पाण्यात उतरून बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. रविवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, पाण्याच्या पातळीत वाढ होत गेल्याने दुपारी तीननंतर मदत व बचाव कार्य थांबविण्यात आले.

120921\12nsk_24_12092021_13.jpg

बचाव कार्य करतांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी

Web Title: The search for the drowned youth stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.