ब्राह्मणगावी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:55 IST2020-12-22T22:35:05+5:302020-12-23T00:55:49+5:30
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. दोन पॅनल आमने-सामने उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ब्राह्मणगावी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. दोन पॅनल आमने-सामने उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, उद्या (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुकांकडून कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. ८ पुरुष सदस्य व ९ महिला सदस्य अशा १७ जागांसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. त्यात अनुसूचित जाती २ , अनुसूचित जमाती ५, ओबीसी वर्ग ५, सर्वसाधारण ५ या जागांचा समावेश आहे.
विद्यमान सदस्यांपैकी अनेक सदस्य यंदाही रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याने नवख्या उमेदवारांची संख्या मोजकी आहे. काही चांगल्या उमेदवारांची निवडणूक लढविण्याची इच्छा दिसत नसली तरी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या मुदतीत किती उमेदवारी अर्ज दाखल होतील, हे पाच दिवसांनंतरच कळणार आहे. मात्र, तरुणांकडून सोशल मीडियावर ग्रामपंचायत निवडणुकीवर वेगवेगळ्या गमतीशीर चर्चा झडू लागल्या आहेत.