आसखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By Admin | Updated: January 31, 2016 22:00 IST2016-01-31T21:59:42+5:302016-01-31T22:00:23+5:30
आसखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

आसखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
आसखेडा (ता. बागलाण) : येथील गौराणे शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. आसखेडा येथील सतीश सहस्त्रबुद्धे यांच्या शेतात बिबट्या आढळून आला. सहस्त्रबुद्धे यांनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
वनरक्षक वर्षा गिते, वनपाल आर. पी. मोहने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून
आले. सहस्त्रबुद्धे व रमेश अहिरे
यांना बिबट्याचे दर्शन
झाले. सध्या विहिरींनी तळ गाठला असून, शेतात रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. संबंधितांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)