सिडको परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ
By Admin | Updated: October 9, 2015 22:45 IST2015-10-09T22:45:13+5:302015-10-09T22:45:59+5:30
सिडको परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

सिडको परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ
सिडको : अंबड तसेच सिडको परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. गुरुवारी उत्तमनगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने सात वर्षीय बालकासह त्याच्या आईस व इतर नागरिकांना चावा घेतल्याचा प्रकार घडला असून, यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नाशिक शहराबरोबर अंबड तसेच वर्दळीच्या व दाट लोकसंख्या असलेल्या सिडको भागात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. घरासमोर खेळणाऱ्या लहान बालकासह नागरिकांच्या चावा घेण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी कामावरून घरी येणाऱ्या कामगारांनादेखील याचा त्रास होत आहे. मंगळवारी उत्तमनगर भागातील गणेश कॉलनी येथे राहणाऱ्या अथर्व कुणसे व त्याच्या आईस पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले मनपाच्या विभागाचे याबाबत दक्षता घेऊन पिसाळलेले कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडकोसह अंबड परिसरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. (वार्ताहर)