लाच घेतल्याप्रकरणी लिपिकाला अटक

By Admin | Updated: July 1, 2016 17:31 IST2016-07-01T15:47:03+5:302016-07-01T17:31:43+5:30

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेच्या आस्थापना विभागाचे वरिष्ठ लिपिक नितीन रमेश खैरनार याला एक लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

The script was arrested in connection with the bribe | लाच घेतल्याप्रकरणी लिपिकाला अटक

लाच घेतल्याप्रकरणी लिपिकाला अटक

>
अमळनेर : अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश देण्यासाठी एक लाख रूपयाची लाच स्वीकारतांना नगरपरिषदेतील अस्थापना विभाग प्रमुख नितीन रमेश खैरनार याला रंगेहात पकडल्याची घटना १ रोजी सकाळी पावणे अकरा वाजता नगरपरिषदेत घडली. ही कारवाई नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांनी निर्देशित केलेल्या व्यक्तींना लाड कमेटीच्या शिफारशीनुसार अनुकंपावर नोकरी देण्यासाठी नऊ उमेदवार पात्र असल्याचे समजते. सर्व कर्मचाऱ्यांकडून नोकरीचे आदेश देण्यासाठी नितीन खैरनार याने तीन, तीन लाखांची मागणी केली होती. पैकी अनिल सुभाष बेंडवाल यांनी दोन लाख रुपयात तडजोड केली. एक लाख रुपये अगोदर आणि एक लाख रुपये आदेश दिल्यानंतर देण्याचे ठरले. अनिल बेंडवाल यांनी नाशिक विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजबाराव उगले आणि अप्पर अधीक्षक प्रशांत देशपांडे यांच्याकडे तक्रार केली होती. २९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लाचलुचपत विभाग कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अमळनेर येवून खैरनार लाच मागणी करत असल्याची खात्री केली. एक लाख रुपये १ रोजी देण्याचे ठरले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस निरीक्षक डी.टी.धोंडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कुशारे, अमोल निकुंभ, विक्रम कडाळे यांनी सापळा रचून सकाळी पावणे अकराच्या सुमारास बेंडवाल यांच्याकडून एक लाख रुपये घेताना नितीन खैरनार यास रंगेहात पकडून अटक करण्यात आली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
नितीन खैरनार याने दोघा, तिघांची नावे सांगितल्याची चर्चा होती. मात्र प्रथमदर्शनी नितीन खैरनार एकमेव आरोपी असल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले.(वार्ताहर)

Web Title: The script was arrested in connection with the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.