शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कालिदासमधील महासभेच्या नाटकावर पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:10 IST

नाशिक : सध्या कोरोनाच्या संकटामुळे महासभा घ्यावी किंवा नाही याबाबत खल सुरू असतानाच अखेर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांशी ...

ठळक मुद्देमहासभा रद्द करण्याचा निर्णय घेतलास्थायी समितीने मात्र १९ मे रोजी बैठक बोलावली आहे.

नाशिक : सध्या कोरोनाच्या संकटामुळे महासभा घ्यावी किंवा नाही याबाबत खल सुरू असतानाच अखेर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर बुधवारी (दि.२०) होणारी महासभा रद्द करण्याचा निर्णय घेतलाआहे. अर्थात महासभा रद्द झाली असली तरी स्थायी समितीची बैठक मात्र मंगळवारी (दि.१९) महासभेच्या ठिकाणी भव्य सभागृहात सभा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विविध विषयांबरोबरच गोदावरी नदीवरील ३२ कोटीरुपयांच्या पुलांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव पटलावर असल्याने ही बैठक होत असल्याची चर्चा आहे.लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या कोरोना वगळता सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांच्या बैठका बंद आहेत. अशातच महापौर सतीश कुलकर्णी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी थेट महाकवी कालिदास सभागृहात महासभा घेण्याचे नियोजन केल्याने त्यावर वादविवाद सुरू झाले होते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभा स्थगित केली आहे.ती सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय झाला नसतानाच स्थायी समितीने मात्र १९ मे रोजी बैठक बोलावली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी ही सभा समितीच्या सभागृहात न होता महासभेच्या सभागृहात होणारआहे. त्यावर अनेक विषयांबरोबरच गोदावरी नदीवरील दोन पूल बांधण्याच्या ठेक्यांना मंजुरी देण्याचा विषय असल्याचे समजते. या पुलांवरून भाजपमध्ये अगोदरच अंतर्गत वाद आहेत. एका गटाने पुलांसाठी आग्रह धरला तर आमदारदेवयांनी फरांदे यांनी या पुलांमुळे गंगापूररोड भागात पुराचा धोका वाढण्याच्या शक्यतेने विरोध केला होता, त्यानंतरदेखील जलसंपदा विभागाचा ना हरकत दाखला घेऊन या पुलाला चालना देण्यात आली होती. त्यामुळे ऐनकोरोनाच्या संकटात ही सभा बोलावण्यात आणि पहिल्याच सभेत याच पुलांच्या मंजुरीचा विषय असल्याने उलटसुलट चर्चा भाजपमध्येच सुरू झाल्या आहेत.कोटनागरी कामे ठप्प झली असल्याने अनेक कामांना चालना देणे आवश्यक होते.मुंबई पुण्यासह अन्य ठिकाणी महासभा आणि अन्य कामे सुरळीत सुरू आहेत.त्यामुळे स्थायी समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. कोरोनाबाबतच्यासुरक्षीतेचे नियम पाळूनही ही सभा होईल.- गणेश गिते, सभापती, स्थायी समिती

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस