इमारत बांधकाम वादावर पडदा
By Admin | Updated: January 7, 2017 00:50 IST2017-01-07T00:49:55+5:302017-01-07T00:50:35+5:30
चांदवड : आमदारांच्या अनुपस्थितीत मुहूर्त साधला

इमारत बांधकाम वादावर पडदा
चांदवड : चांदवड पंचायत समितीच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. ही इमारत त्याच जागी बांधावी की प्रशासकीय इमारतीकडे बांधावी असे दोन प्रवाह असताना अखेर चांदवड पंचायत समितीची इमारत त्याच जागी करण्याची मान्यता मिळाली खरी, पण तिच्या भूमिपूजनाला काही केल्या मुहूर्त सापडत नव्हता. अखेर दि. २ जानेवारी रोजी या पंचायत समितीचे भूमिपूजन करण्याचा घाट घालण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अनिता जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार उत्तम भालेराव व शिरीष कोतवाल, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य ज्योती माळी, बंडू गांगुर्डे, विलास माळी, दादाभाऊ अहिरे, पंचायत समिती सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, यू. के. अहेर, अनिल काळे, शिवाजी कासव, चंद्रकांत गवळी, उपसभापती मनीषा जाधव, मंगला बर्डे, बाकेराव जाधव, विजय जाधव, अरुण न्याहारकर, बाळासाहेब माळी, शहाजी भोकनळ, सुखदेव जाधव, आर. डी. थोरात, भीमराव जेजुरे, राजेंद्र गिडगे आदि मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन यू. के. अहेर यांनी, तर प्रास्ताविक अनिल काळे यांनी केले. यावेळी माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती अनिता जाधव, डॉ. सयाजीराव गायकवाड यांची भाषणे झाली. तुकाराम सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी ठेकेदार एन. एच. अथरे, भल्ला यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास निवृत्ती घाटे, उत्तमराव ठोंबरे, चंद्रकांत पाटील, शांताराम घुले, नवनाथ जाधव, रावसाहेब भालेराव, संजय पाडवी, अनिल भालेराव, म्हसू गागरे, दत्ता वाघचौरे, भीमराव निरभवणे, समाधान जामदार, अल्ताफ तांबोळी, अन्वर शहा, भाऊसाहेब जोरे, निवृत्ती व्यवहारे, अनिल पवार, प्रकाश शेळके, शरद अहेर आदिंसह नागरिक उपस्थित
होते. (वार्ताहर)