शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

आदिवासी रॅँचोंचा वैज्ञानिक आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 5:07 PM

पेठ तंत्रनिकेतन : पायडल शिवाय चालवा सायकल

ठळक मुद्दे डोक्यात हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालूच होणार नाही, मद्य प्राशन करून दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केल्यास ती लगेचच बंद पडेल. अशा प्रकारच्या सुविधा करण्यात आल्या आहेत.

पेठ : तालुक्यातील दुर्गम भागात दऱ्याखो-यात राहणा-या व येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंत्रनिकेतनचे प्रशिक्षण घेणा-या आदिवासी रँचोंनी संशोधन करीत बॅटरीवर चालणारी सायकल, चोरापासून घराची सुरक्षा करणारी आधुनिक यंत्रणा, स्मार्ट हेल्मेटसह मद्यप्राशन केले असल्यास दुचाकी सुरुच होणार नसल्याचा वैज्ञानिक आविष्कार दाखविला असून नुकत्याच झालेल्या तंत्रनिकेतनच्या प्रदर्शनात त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.एरवी सायकल चालवतांना स्वाराला चांगलीच कसरत करावी लागते. पायडल मारल्याशिवाय सायकल पुढे सरकने शक्य नाही. यावर संशोधन करीत विद्यार्थी विठोबा खैरणार, रूपाली खंबाईत, तानाजी बागूल, नुतन हाडस, रविंद्र राऊतमाळे व मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र मेतकर यांनी जुन्या सायकलला केवळ ५ हजार रूपयाचा खर्च करून नव्या युगाची बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. विशेष म्हणजे जवळपास शंभर किलोचे ओझे घेऊन ही सायकल खडतर रस्त्यावरही विनासायास चालवू शकतो. या सायकलीची नुकतीच अधिकारी व शिक्षकांसमवेत यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे इंधनाबरोबर पर्यावरणाचे रक्षण होणार असल्याचे नव संशोधकांनी सांगितले. याच संस्थेतील विद्यार्थी मयुरी भोये, मनिषा गांगोडे, अजय गवळी, महेंद्र सातपुते आदींनी शिक्षक संभाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट हेल्मेटची निर्मिती केली आहे. यामध्ये डोक्यात हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालूच होणार नाही, मद्य प्राशन करून दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केल्यास ती लगेचच बंद पडेल. अशा प्रकारच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. या स्मार्ट हेल्मेटमुळे रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास शिक्षक व मुलांनी व्यक्त केला आहे. याच बरोबर चोरांपासून घराची सुरक्षा करणारी यंत्रणा, मोबाईल चार्जिंग रोबोट, ई -सायकल आदी प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.५२ प्रतिकृती सादरपेठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंत्र प्रदर्शन 2019 भरवण्यात आले. यामध्ये नव संशोधकांनी जवळपास ५२ प्रतिकृती सादर केल्या. महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षण अधिकारी एस.डी. नलावडे, प्राचार्य एम.एस. चकोर उपस्थित होते. प्राचार्य एस. सी. राठोड यांनी प्रास्ताविक केले. या प्रदर्शनाचा तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. 

टॅग्स :Nashikनाशिकscienceविज्ञान