शालेय विद्यार्थिनीची आत्महत्त्या
By Admin | Updated: September 13, 2016 01:42 IST2016-09-13T01:41:28+5:302016-09-13T01:42:01+5:30
संत कबीरनगर येथील घटना : गंगापूररोड ठाण्यात गुन्हा दाखल

शालेय विद्यार्थिनीची आत्महत्त्या
नाशिक : तेरा वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली़ या मुलीचे नाव पायल गजानन गायकवाड असे असून, ती भोसला मिलिटरी गेटजवळील संत कबीरनगरमधील रहिवासी आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास घरी कोणी नसताना पायलने गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ सायंकाळी तिची आई कामावरून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ तिच्या पश्चात आई, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे़ दरम्यान, तिच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
नाशिक : पंचवटी परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी अपहृत मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रोहित घुगे याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़