शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीनिमित्त  विठ्ठल नामाची शाळा भरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:39 IST

शहरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. यावेळी ज्ञानोबा-माउली-तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. यावेळी ज्ञानोबा-माउली-तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.  वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष मोगल, मुरकुटे, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत शिंदे, मुख्याध्यापक पी. पी. लांडगे, उपाध्यक्ष कापडणीस उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पालखीचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन वैशाली सूर्यवंशी यांनी केले. घुले यांनी आभार मानले.सागरमल मोदी विद्यालयनाएसो संस्था संचलित सागरमल मोदी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकºयांची वेशभूषा केली होती. यावेळी अशोक शिरुडे, श्रीराम ठाकरे, अश्विनी पगार, मनीषा जोशी, किशोरी शुक्ल, उषा जोपळे, मंजूषा झेंडे, मनीषा कापसे, दीपाली पाटील, तेजश्री बुवा आदी उपस्थित होते.किड्स कॅम्पस स्कूल :एम. एच. फाउंडेशन संचलित किड्स कॅम्पस इंग्लिश मीडियम प्री-स्कूल वाढणे कॉलनी, प्रभातनगर, म्हसरूळ येथे आषाढी वारी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुलांनी वारकºयांची वेशभूषा केली होती. वैशाली कोतवाल यांनी संतांची माहिती सांगितली. विठुनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब हिरे, मुख्याध्यापक मनीषा हिरे, हिना भोये, सुनंदा मोजाड, अंजली कोळेकर, लक्ष्मण शार्दुल, वैशाली शार्दुल आदी उपस्थित होते.मखमलाबादला अभिनव शाळेत विठ्ठलाचा जयघोषअभिनव बालविकास मंदिर मखमलाबाद शाळेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक सचिन पंडितराव पिंगळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे, संपतराव पिंगळे, संजय फडोळ, सुभाष पिंगळे व सर्व शालेय समिती सदस्य यांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. मखमलाबाद गावातून मुलांनी पालखी मिरवणूक काढली. अनेक महिलांनी विठ्ठलाचे पूजन केले. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांनी आभार मानले.

टॅग्स :SchoolशाळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी