शाळा सुरू झाल्या, क्लासेस केव्हा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:27+5:302021-09-26T04:16:27+5:30
नाशिक : शाळांबरोबर कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने शनिवारी ...

शाळा सुरू झाल्या, क्लासेस केव्हा ?
नाशिक : शाळांबरोबर कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. २५) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यापूर्वी हुतात्मा स्मारक येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक पार पडली.
गत दीड वर्षापासून क्लासेस बंद आहे. ऑनलाईन क्लासेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे क्लासेस चालकांसह विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे. आर्थिक समस्यांमुळे क्लासेस चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, त्या आदेशात कोचिंग क्लासेस सुरु करण्याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे क्लासेस सुरू केल्यास स्थानिक पातळीवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे जिल्हा पातळीवर स्वतंत्र आदेश काढून क्लासेसला परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागास हे निवेदन देण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, सरचिटणीस लोकेश पारख, कल्पेश जेजुरकर, निलेश भुतडा, सुधीर गायधनी, रवींद्र पाटील, विवेक भोर यांच्यासह क्लासेस संचालक उपस्थित होते.
---------मुख्य अंक पान २ साठी : फोटो : आर ला : २५ निवेदन ----------