पोद्दार स्कूल तर्फे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:28 IST2021-02-28T04:28:57+5:302021-02-28T04:28:57+5:30

प्रदर्शनाचे उद्घा‌टन लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचा प्रशालेचे प्राचार्य मनोहर महाजन आणि संस्थेचे ...

School Science Exhibition by Poddar School | पोद्दार स्कूल तर्फे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

पोद्दार स्कूल तर्फे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

प्रदर्शनाचे उद्घा‌टन लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचा प्रशालेचे प्राचार्य मनोहर महाजन आणि संस्थेचे महाव्यवस्थापक समीर वागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतानाच श्रावणी चौधरी या विद्यार्थिनीने सर सी. व्ही. रामन यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी प्रदर्शनात प्राथमिक गटात सुनेरी पाटील तर माध्यमिक गटातून आद्रिका रॉय यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मान्यवर शिक्षकांच्या सत्काराबरोबरच वार्षिक नियतकालिक ‘माय् लाॅग’ चे प्रकाशन करण्यात आले.

सूत्र संचालन श्वेता झाडे, तन्वी शेळके, कुशल शानिवारे आणि ज्युलिएट मोंटेरो यांनी केले तर तनुश्री मित्रा यांनी आभार मानले. यावेळी प्रीती सोनावणे, प्रीसिला गोडसे आणि निलोफर सय्यद उपस्थित होते.

Web Title: School Science Exhibition by Poddar School