शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात

By Admin | Updated: September 2, 2014 01:12 IST2014-09-01T21:43:53+5:302014-09-02T01:12:42+5:30

शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात

School football competition enthusiasm | शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात

शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात

प्रतिनिधी

नाशिक, दि. ०१ : नाशिकच्या फुटबॉल खेळाडूंना योग्य सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी योग्य ती मदत केली जाईल, असे व्यक्तव्य शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी फुटबॉल खेळाडू शरद अहेर यांनी केले. क्रीडा साधना या संस्थेतर्फे आयोजित शालेय खुल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
क्रीडा साधना संस्था, नाशिक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये १७ वर्षांआतील शालेय मुला-मुलींच्या खुल्या शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद अहेर यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष तथा हॅण्डबॉलचे राष्ट्रीय खेळाडू अर्जुन टिळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मुकेश डहाळे, उपशहराध्यक्ष याग्निक शिंदे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र शिंदे, तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि अर्जुन टिळे यांनीही खेळाडुंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये सिल्व्हर ओक, मराठा हायस्कूल, काकासाहेब देवधर स्कूल, व्ही. के. पाटील हायस्कूल, के. के. वाघ स्कूल, न्यू ईरा स्कूल, सेंट लॉरेन्स हायस्कूल, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, रंगुबाई जुन्नरे स्कूल, देवळाली हायस्कूल, देवळाली; इच्छामणी हायस्कूल, सॅक्रेट हॉट स्कूल, रासबिहारी स्कूल, होरायझन अ‍ॅकॅडमी, विद्या प्रबोधिनी प्रशाला, स्वामी विवेकानंद हायस्कूल अशा एकूण १९ संघांनी सहभाग घेतला.

Web Title: School football competition enthusiasm