कळवणमध्ये मराठा क्र ांती मोर्चासाठी शाळा बंद

By Admin | Updated: September 24, 2016 01:09 IST2016-09-24T01:05:05+5:302016-09-24T01:09:48+5:30

वाहतुकीचे नियोजन : विविध समाजबांधव, संघटनांकडून पाठिंबा; गावागावांत जनजागृती, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

School closes in Kalvan to Maratha Kranti Morch | कळवणमध्ये मराठा क्र ांती मोर्चासाठी शाळा बंद

कळवणमध्ये मराठा क्र ांती मोर्चासाठी शाळा बंद


कळवण : नाशिक महानगरात शनिवार, दि. २४ रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानिमित्त कळवणमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
येथील मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, महात्मा गांधी विद्यामंदिर मालेगाव, कळवण शिक्षण संस्था, गुरुदत्त शिक्षण संस्था मानूर, श्री चिंतामणी शैक्षणिक संस्था भेंडी या शैक्षणिक संस्थांनी मराठा क्र ांती मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन पाठिंबा दिला असल्याने या संस्थाअंतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संकुले यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले.
नाशिकच्या मराठा मोर्चाच्या वातावरण निर्मितीसाठी कळवण, मानूर, पाळे, अभोणा, कळवण खुर्द, शिरसमणी, साकोरे येथे युवकांनी वाहनांना मोर्चाचे स्टिकर, भगवे झेंडे लावून कळवण शहरातून मोटारसायकल रॅली काढून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. तालुक्यातील गावागावांतील व कळवण शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोर्चाचे फलक, भगवे ध्वज लावण्यात आले असून, वातावरण मोर्चामय करण्यात आले आहे.
मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रवींद्र देवरे, कारभारी अहेर, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, शैलेश पवार, सुधाकर पगार, विकास देशमुख, जितेंद्र वाघ, देवीदास पवार, जितेंद्र पगार, प्रदीप पगार, हेमंत पाटील, गोविंद पगार, अ‍ॅड. संजय पवार, घनश्याम पवार, निंबा पगार, शीतलकुमार अहिरे, विलास रौंदळ, हिरामण पगार, गौरव पगार, प्रवीण रौंदळ, प्रमोद पाटील, अमोल पगार, पप्पू पवार, मुन्ना पगार आदिंनी केले आहे.
विविध संघटनांचा
मराठा मोर्चाला पाठिंबा
कळवण : मराठा समाजबांधवांच्या वतीने नाशिकला निघणाऱ्या मराठा क्र ांती मूक मोर्चास कळवण शहर व तालुक्यातील विविध समाजांच्या वतीने तसेच विविध संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. माळी समाजबांधवांच्या वतीने वसाकाचे माजी संचालक कृष्णा बच्छाव, शशिकांत बागुल, कौतिक गांगुर्डे यांनी जिल्हा बॅँक संचालक धनंजय पवार यांना निवेदन देऊन मराठा क्रांती मोर्चाला व मराठा समाजबांधवांच्या विविध मागण्यांना पाठिंबा दिला. लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष संजय मालपुरे, योगेश मालपुरे, सुनील शिरोरे, सुभाष शिरोरे, डॉ. जी. व्ही. मालपुरे, डॉ. के. के. कोठावदे, सुनील महाजन, नीलेश महाजन, दीपक महाजन, मुरलीधर अमृतकार, धनंजय अमृतकार, राजेंद्र अमृतकार, राजेंद्र खैरनार, शरद खैरनार, सागर खैरनार आदिंनी मोर्चाला व विविध मागण्यांना पाठिंबा दिला आहे.
कळवण शहर व्यापारी महासंघ, कळवण शहर हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल व प्लायवूड असोसिएशन, कळवण शहर व्यापारी असोसिएशन, कळवण शहर सुवर्णकार समाज, कळवण तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, कळवण शहर व्यापारी असोसिएशन, कळवण शहर किराणा व्यावसायिक संघटना, कळवण शहर नाभिक समाज, कळवण शहर इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन, कळवळ शहर बिल्डिंग मटेरियल असोसिएशन, कळवण शहर गिरणी व मिल संघटना, कळवण शहर हॉटेल संघटना आदिंनी पाठिंबा दिला आहे.
कळवण तालुका तेली समाजाने तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार सोनवणे यांना निवेदन देऊन मराठा क्रांती मोर्चाला व मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी समाजाचे तालुकाध्यक्ष रविकांत सोनवणे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश दगडू सोनवणे, विजय वालखडे, सुरेश जाधव, सचिन जाधव, किशोर सोनवणे, नंदू काळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
मोटारसायकल रॅलीद्वारे मोर्चाची जनजागृती
मराठा क्र ांती मोर्चासाठी पक्षभेद बाजूला ठेवत एकवटलेल्या मराठा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कळवण शहरात मराठा समाजबांधवांच्या गाठीभेटी घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. कळवण, अभोणा, मानूर, पाळे परिसरातून आज शुक्र वारी सकाळी व दुपारी मराठा क्र ांती मोर्चा जनजागृती मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मोर्चाची कळवण शहर व तालुक्यातील विविध भागातून मोटारसायकल रॅलीद्वारे शुक्र वारी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या रॅलीत अजय पगार, देवीदास शिंदे, दादा निकम, निंबा पगार, अनिल निकम, सुरेश निकम आदिंसह शेकडोच्या संख्येतील मराठा समाजबांधव व युवक उत्स्फूर्त सहभागी झाले होते. युवक काळे टी शर्ट परिधान करून सहभागी होणार असून, शहरात टी शर्ट मिळत नसल्याने नाशिक शहरातून मागवले गेले आहेत. महिलाही काळ्या साड्या परिधान करून मोर्चात सहभागी होणार
आहेत.
 

Web Title: School closes in Kalvan to Maratha Kranti Morch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.