वीरगाव येथे स्कूलबसला आग
By Admin | Updated: January 2, 2016 22:58 IST2016-01-02T22:10:06+5:302016-01-02T22:58:07+5:30
वीरगाव येथे स्कूलबसला आग

वीरगाव येथे स्कूलबसला आग
वीरगाव : येथील रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसला शालेय वेळेतच शॉटसर्किटने आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. सुदैवाने यावेळी या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी हानी टळली.
येथील रॉयल इंग्लिश मीडियमची स्कूलबस शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन आल्यानंतर शाळेच्या आवारात उभी होती. यावेळी या बसच्या वायरिंगमध्ये अचानक शॉटसर्किट होऊन गाडीतून धूर निघू लागला. यावेळी लागलेल्या आगीत गाडीतील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली.
शालेय कर्मचारी वर्गासमवेत गावातील नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने ही आग विझण्यास मदत झाली. पुढील अनर्थ टळला. अवघ्या दहा मिनिटापूर्वीच शाळेतील विद्यार्थ्यांना उतरवून ही बस पार्किंगमध्ये लावण्यात आली होती. यावेळी या बसमध्ये विद्यार्थी असते तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान शालेय व्यवस्थापनाकडून शाळेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संतप्त पालकवर्गाकडून यावेळी करण्यात आला. (वार्ताहर)