शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचा दोन नोव्हेंबरला शाळा बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:49 IST

शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला मान्यता घेण्यासाठी दाखल करावे लागले खटले आणि अधिकारी पातळीवर येणाऱ्या अडचणीविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला नाशिकसह राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कर्मवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी अव्हाड यांनी दिली

ठळक मुद्देशिक्षण संस्था चालकांचे 2 नोव्हेंबरला लाक्षणीक आंदोलन प्रलंबीत मागण्यांसाठी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णयमागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत शाळा बंदचा इशारा

नाशिक : शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला मान्यता घेण्यासाठी दाखल करावे लागले खटले आणि अधिकारी पातळीवर येणाऱ्या अडचणीविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला नाशिकसह राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कर्मवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी अव्हाड यांनी दिली सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषदेतून दिली. यासंदर्भात शिक्षण संचालकांना 22 ऑक्टोबरला निवेदन देण्यात आल्याचेही संस्थाचालकांनी सांगितले. महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांद्वारे गेली अनेक वर्ष  शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे . परंतु, गेल्या काही वर्षापासून संस्थाचालकांना अनेक आर्थिक, प्रशासकीय व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रभावित करणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने  मराराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने २ नोव्हेबरला राज्यातील शाळा बंद ठेवून लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील ७० ते ७५ शिक्षण संस्थांच्या शाळा यादिवशी बंद राहणार आहेत. परंतु, अनेक मोठ्या संघटना या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता आहे. मोठ्या शिक्षण संथांनी सरकारी हस्तक्षेपातून जवळपास ६३४ शिक्षकांची नियुक्ती करून घेतली आहे, त्यामुळे अशा संस्था सरकारच्या  दबावाला बळी पडत असून त्या या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे यावेळी  मराराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  यावेळी बाळासाहेब पाटील, रामराव मोरे, केशव पाटील, प्रभाकर धात्रक,  विजय काळे, सोमनाथ चौधरी, प्रवीणजोशी, गणपत मुठाळ, सुर्यकांत रहाळकर आदि उपस्थित होते. 

तर बेमुदत आंदोलनाचाशिक्षण संस्था चालकांच्या तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांसदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने वारंवार पाठपुरावार करूनही सरकारक डून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संस्था चालकांनी लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही सराकारने संस्थाचालकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर दिवाळीनंतर बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही संस्थाचालकांनी यावेळी दिला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाTeacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरती