शाळा २६ मध्ये ‘नन्ही कली’

By Admin | Updated: November 9, 2015 22:45 IST2015-11-09T22:44:18+5:302015-11-09T22:45:31+5:30

शाळा २६ मध्ये ‘नन्ही कली’

In school 26, 'Noney bud' | शाळा २६ मध्ये ‘नन्ही कली’

शाळा २६ मध्ये ‘नन्ही कली’

सातपूर : ‘नन्ही कली’ उपक्रमांतर्गत येथील शिवाजीनगर महापालिका शाळा क्र. २६ मधील विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मंजूषा दराडे यांनी माता-पालकांचे समुपदेशन केले.
महानगरपालिकेच्या शाळा क्र. २६ मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजूषा दराडे यांनी माता पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मानसिक व शारीरिक वाढीसाठी मुलांना नैसर्गिक वातावरणात खेळू द्यावे, पोषक आणि संतुलित आहार द्यावा, मुलांना डब्यात फास्ट फूड किंवा पॅकिंगचे पदार्थ देऊ नयेत, आरोग्याकडे लक्ष द्यावे, नियमित व्यायामाची सवय लावावी आदि माहिती दिली. उपस्थित महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सायरा सय्यद उपस्थित होत्या. केंद्र समन्वयक शोभा वाजे यांनी प्रास्ताविक केले. स्वागत ज्योती वाक््चौरे यांनी केले. सूत्रसंचालन चांगदेव सोमासे यांनी केले. अर्चना पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)मनपा शाळा क्र. २६ मध्ये ‘मुलांचे आरोग्य’ विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. मंजूषा दराडे. समवेत शोभा वाजे, ज्योती वाकचौरे, सायरा सय्यद.

Web Title: In school 26, 'Noney bud'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.