कळवण : उपजिल्हा रु ग्णालयातील लॅबला विविध तपासण्या करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचा शासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून नियमित पुरवठा होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. रु ग्णांना काही टेस्टसाठी महालॅबमध्ये पाठवले जाते. मात्र महालॅबमध्येही अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने रु ग्णांना शासकीय सुविधांचा लाभ मिळण्याऐवजी खासगी लॅबमध्ये जाऊन तपासण्या करून द्याव्या लागत आहे. शुक्र वारी अनेक रु ग्णांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.शासनाने सर्वसामान्य रु ग्णांसाठी वेगवेगळ्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवल्या खऱ्या, मात्र स्थानिक पातळीवर ढिसाळ कारभारामुळे रु ग्णांची हेळसांड होत आहे. कळवण येथील उपजिल्हा रु ग्णालयात शुक्र वारी तालुक्यातीलच कळमथे येथील वेणुबाई यादव वाघ या वैद्यकीय तपासणीसाठी आल्या होत्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एचबी व सीबीसी टेस्ट करण्याच्या सूचना केल्यानंतर त्यांनी रु ग्णालयातीलच लॅबमध्ये जाऊन चौकशी केली. मात्र रु ग्णालयातील सीबीसी टेस्ट काही कारणामुळे बंद असून, शहरात असलेल्या शासनाच्याच महालॅबमध्ये टेस्ट करण्यासाठी पाठवले. वेणूबाई वाघ या महालॅबमध्ये तपासणीसाठी गेल्या असता आज तपासणी केली जाणार नाही नंतर या, असे त्यांना सांगण्यात आले. अशा पद्धतीने वाघ यांना तपासणीसाठी हेलपाटे मारावे लागल्याने व उपजिल्हा रु ग्णालय आणि महालॅब यांच्यात समन्वय नसल्याने रु ग्णांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या लॅबला रसायनाचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 18:43 IST
उपजिल्हा रु ग्णालयातील लॅबला विविध तपासण्या करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचा शासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून नियमित पुरवठा होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या लॅबला रसायनाचा तुटवडा
ठळक मुद्देमहिला दिनी रुग्णांची हेळसांड विविध तपासण्यांसाठी रुग्णांना आर्थिक फटका