शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

बांधकाम नकाशांचे स्कॅनिंग रखडले

By admin | Updated: April 23, 2017 02:17 IST

नाशिक : सदनिकांचे नकाशे व परवानग्या पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जून २०१६ पासून घेण्यात आला.

 नाशिक : शहरातील विविध अपार्टमेंट, सोसायट्या येथे सदनिका-फ्लॅट खरेदी करताना महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणेच बांधकाम होते आहे किंवा नाही, याची ग्राहकांना खातरजमा करण्यासाठी संबंधित सदनिकांचे नकाशे व परवानग्या पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जून २०१६ पासून घेण्यात आला. त्यानुसार, सुमारे साडेसहा हजार मंजूर नकाशांपैकी केवळ २५०० नकाशाचेच संकेतस्थळावर उपलब्ध असून, उर्वरित नकाशे उपलब्ध करून देण्यात नगररचना विभागाने हात आखडता घेतल्याने एकूणच कामकाजाबाबत संशयकल्लोळ वाढला आहे. मंजूर नकाशाप्रमाणे शहरात बांधकामे केली जात नसल्याची अनेक उदाहरणे ‘कपाट’ प्रकरणातून समोर आलेली आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून महापालिकेकडून नकाशा मंजूर करून घेतला जातो; परंतु प्रत्यक्षात नकाशानुसार बांधकाम केले जात नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडलेले आहेत. महापालिकेने त्यासाठीच ग्राहक जागृती करण्यासाठी विविध अपार्टमेंट, सदनिका, फ्लॅट यांचे नकाशे व परवानग्या पालिकेच्या ँ३३स्र:ुस्र.ल्लेू४३्र’्र३्री२.्रल्ल या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जून २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला होता. त्यासाठी स्वत: गेडाम यांनी सोशल मीडियावरून जागृतीपर मोहीमही राबविली होती. महापालिकेने मंजूर केलेले नकाशे तपासूनच नकाशाप्रमाणे बांधकाम होते आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आणि नंतरच सदनिका खरेदी करण्याचे आवाहनही महापालिकेने ग्राहकांना केले होते. मंजूर नकाशांची संख्या खूप असल्याने जसे स्कॅन होतील तसे ते आॅनलाइन उपलब्ध करून दिले जाणार होते. त्यानुसार, संगणक विभागामार्फत दररोज सुमारे दररोज ५० ते १०० नकाशे अपलोड केले जात होते. त्यानुसार, संगणक विभागाने नगररचना विभागामार्फत जसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे सुमारे २५०० नकाशे स्कॅन केले, परंतु ही आरंभशूरताच ठरली असली गेल्या सात-आठ महिन्यांपासून नकाशांचे स्कॅनिंगचे काम रखडले आहे. नगररचना विभागामार्फत सदर नकाशेच उपलब्ध करून दिले जात नसल्याने काम रखडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नगररचना विभागाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.