शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेत घोटाळेच घोटाळे अन चौकशाच चौकशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 16:14 IST

नाशिक- महापालिकेत गाजत असलेल्या अनेक घोटाळ्यांवर चौकशीची मात्रा लागु पडणार नाही, मात्र चौकशी समिती नियुक्त केली की घोटाळे थांबणारच आहेत, अशा अविर्भावात समित्या नियुक्त केल्या जात आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्याच महासभेत टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी आणखी एक समिती गठीत केली आहे. मात्र, या चौकशीतून खरोखरीच काही गांभिर्य बाहेर पडेल की, केवळ वेळ घालवण्याचा प्रकार घडेल हे लवकरच स्पष्ट हेाईलच.

ठळक मुद्देएकेका प्रकरणाच्या अनेक चाैकशाआरोप खूप परंतु निष्कर्ष निघेना

संजय पाठक, नाशिकमहापालिकेत गाजत असलेल्या अनेक घोटाळ्यांवर चौकशीची मात्रा लागु पडणार नाही, मात्र चौकशी समिती नियुक्त केली की घोटाळे थांबणारच आहेत, अशा अविर्भावात समित्या नियुक्त केल्या जात आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्याच महासभेत टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी आणखी एक समिती गठीत केली आहे. मात्र, या चौकशीतून खरोखरीच काही गांभिर्य बाहेर पडेल की, केवळ वेळ घालवण्याचा प्रकार घडेल हे लवकरच स्पष्ट हेाईलच!

नाशिक महापालिकेत सध्या कोरेनामुळे अन्य विषय गाजत नसले तरी भूखंड, आरक्षण, भूसंपादन आणि त्यासाठी दिले जाणारे मोबदले हे अत्यंत प्राधान्याचे विषय ठरले आहेत. त्याच बरोबर जुन्या प्रकरणातील मोबदल्यातील घाेळ हे देखील उघडकीस येत असल्याने सध्या महापालिकेत कोराेना सारख्या संकटापेक्षा भूखंड मोबदले आणि घोटाळे यांचीच चर्चा आहे. मध्यंतरी देवळाली येथील एका आरक्षीत भूखंडाच्या मेाबदल्यात सुमारे शंभर कोटी रूपयांचा टीडीआर मोबदला चुकीच्या पध्दतीने देण्यात आल्याचा आरोप झाला. मात्र, हे आरोप वेगवेगळ्या पध्दतीने वेगवेगळ्या राजकिय पक्षांनी केले. त्यातील शिवसेनेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांनी राज्यात सत्ता असल्याने आपल्याच पक्षाच्या नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली आणि त्यांनी महापालिकेला तातडीने चौकशी करण्यास सांगितले. तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणाऱ्या ॲड. शिवाजी सहाणे यांनी थेट विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांनी देखील चौकशी आरंभली आहे. त्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी दाेन अधिकाऱ्यांकडून देखील चौकशीचे कामकाज सुरू केले आहे. म्हणजेच एकाच प्रकरणासाठी चार चौकशांचे काम सुरू आहे. त्यातून निष्कर्ष काय लागेल हे मात्र सांगणे कठीण आहे.

याच नव्हे तर नाशिक महापालिकेत अशा अनेक प्रकरणासंदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहेत. काही भूखंडांचे मालक नसलेल्यांना कोट्यवधी रूपयांचा मोबदला रोखीत आणि काही वेळा टीडीआर स्वरूपात देण्यात आला आहे. तर काही प्रकरणात रिक्त भूखंड नसताना जमिन मालक माेबदला लाटून बसला आणि भूखंडच महापालिकेच्या नावावर नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या अनेक घोटाळ्यांसाठी गेल्याच आठवड्यात झालेल्या महासभेत महापौरांनी एक समिती घोषीत केली. त्यात लोकप्रतिनिधींचा देखील समावेश केला आहे. प्रकरणांच्या चौकशीचा नक्की स्कोप नसल्याने एकुणच या समितीच्या माध्यमातून काय बाहेर पडेल हे स्पष्ट होणे कठीण आहे. परंतु अशा घाऊक चौकशांमधून फार काहीनिष्पन्न होईल असे वाटत नाही. त्यातच आता वर्षभरावर निवडणूका आल्या आहेत. त्यामुळे समित्यांना प्रशासनाकडून मिळणारा प्रतिसाद उपलब्ध हेाणारी कागदपत्रे या सर्वांचा विचार केला तर समिती कितपत तग धरेल हे सांगता येत नाही. त्यातच आजवर महापालिकेत केाणत्याही भूखंड घोटाळ्याच्या तळापर्यंत कोणीच गेलेले नाही की तसे काही अंतिमत: निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे चाैकशी समिती नावालाच राहू नये. व चौकशी समितीचा भोकाडा दाखवण्यासाठी उपयोग होऊ नये इतकेच.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका