कहॉ गये अच्छे दिन..

By Admin | Updated: June 26, 2014 00:25 IST2014-06-26T00:23:23+5:302014-06-26T00:25:03+5:30

कहॉ गये अच्छे दिन..

Say good day .. | कहॉ गये अच्छे दिन..

कहॉ गये अच्छे दिन..

  रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड रेल्वे भाडेवाढ निषेधार्थ रेल रोकोंनाशिकरोड : केंद्र शासनाने रेल्वे भाड्यात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ व सदर भाडेवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले.
रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासी भाड्यात १४.२ टक्के व मालभाड्यात ६.५ टक्के वाढ केल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महागाईने होरपळलेले सर्वसामान्य नागरिक या भाडेवाढीमुळे आणखीन त्रस्त होणार आहेत. यामुळे केंद्र शासनाने रेल्वे वाहतुकीच्या भाड्यात केलेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर तपोवन एक्स्प्रेस व काशी एक्स्प्रेससमोर रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनामध्ये कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते, माजी मंत्री शोभा बच्छाव, शरद अहेर, नगरसेवक कन्हैया साळवे, राहुल दिवे, सतीश मंडलेचा, राजू टर्ले, रईस
शेख, दिलीप आहिरे, शरद
जगताप, शालिग्राम बनसोडे, धनंजय घोरपडे, गणेश खिराडकर, कामिल इनामदार, प्रकाश चंदनसे, प्रकाश जामसिंधीकर, कुसुम चव्हाण, शकुंतला त्रिवेदी, विजया जाधव, कलावती गायकवाड आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) ेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन करताना कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते, शोभा बच्छाव, कन्हैया साळवे, राजू टर्ले, सतीश मंडलेचा, शरद अहेर, स्वप्नील पाटील, शरद जगताप, दिलीप आहिरे, धनंजय घोरपडे, गणेश खिराडकर, कामिल इनामदार, शकुंतला त्रिवेदी, कुसुम चव्हाण, विजया जाधव आदि.

Web Title: Say good day ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.