शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘ईद मुबारक’ म्हणा, पण गळाभेट अन् हस्तांदोलन टाळा !

By अझहर शेख | Updated: May 24, 2020 17:20 IST

यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देईदच्या सणावर कोरोनाचे सावट हस्तांदोलन व गळाभेट पुर्णपणे टाळाईदचे सामुहिक नमाजपठण रद्द

नाशिक :रमजान ईदच्या औचित्यावर गळाभेट-हस्तांदोलन करत ‘ईद मुबारक’ची शुभेच्छा देण्याची प्रथा आहे; मात्र यावर्षी ही प्रथा पाळू नये, असे आवाहन धर्मगुरूंसह जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाकडूनही करण्यात आाले आहे.कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी नागरिकांनी आपआपसांत ‘डिस्टन्स’ ठेवणे बंधनकारक आहे. ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याकरिता हस्तांदोलन व गळाभेट पुर्णपणे टाळावी जेणेकरून कोरोनाच्या संक्रमणाचा धोका निर्माण होणार नाही. यावर्षी संपुर्ण रमजान पर्व कोरोनाच्या सावटाखाली पार पडले. रमजान ईदच्या सणावरही कोरोनाचे सावट आहे. यामुळे सामुहिक नमाजपठणाचे ठिकठिकाणी होणारे सोहळेही रद्द करण्यात आले आहे. यावर्षी ईदची स्पेशल डिश ‘शिरखुर्मा’चा आस्वाद आपआपल्या घरी कुटुंबियांसोबतच घ्यावा लागणार आहे. मित्र-परिवार, नातेवाईकांच्या घरीदेखील नागरिकांना ये-जा करणे अवघड होणार आहे. कोरोनाचा आजार टाळण्यासाठी नागरिकांना यंदा ईद आपल्या घरीच राहून साजरी करावयाची आहे.

यंदाची ईद मुस्लीम बांधवांना अगदी साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. किराणामध्ये काही प्रमाणात सुकामेवा खरेदी करून दुधाच्या सहाय्याने पारंपरिक प्रथेनुसार ‘शिरखुर्मा’ तयार करून घरांमध्ये फातिहापठण केले जाणार आहे. यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था राज्यातील विविध शहरांमध्ये पुढे आल्या आहेत.संपुर्ण रमजान पर्व काळात सर्वच शहरांमधील मशिदीही लॉकडाउन राहिल्या. मशिदींमध्येही मागील दोन महिन्यांपासून केवळ पाच व्यक्ती नमाजपठण करत आहेत. मशिदींमध्ये गर्दी होणार नाही, याची पुर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.
---कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता रमजान ईद अगदी साधेपणाने साजरी केली जात आहे. यावर्षी ईदचे सामुहिक नमाजपठण रद्द करण्यात आले आहे. ईदगाह मैदानावर नमाजपठणाचा पारंपरिक सोहळा यंदा होणार नाही. नागरिकांनी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाउनचे नियम पाळावेत. ईदच्या शुभेच्छा देताना अलिंगण व हस्तांदोलन शक्यतो टाळावे, जेणेकरून कोरोनाचा धोका उद्भवणार नाही. आपआपल्या घरांमध्येच राहून नमाजपठण करावे.- हाफीज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब, नाशिक

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकShajahaani Eidgahशाहजहांनी इदगाहRamzanरमजानRamzan Eidरमजान ईद