शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सव्वालाख विद्यार्थी
By Admin | Updated: March 22, 2015 00:45 IST2015-03-22T00:45:20+5:302015-03-22T00:45:32+5:30
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सव्वालाख विद्यार्थी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सव्वालाख विद्यार्थी
नाशिक : आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत रविवारी (दि. २२) घेण्यात येणाऱ्या पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून एक लाख २७ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यात १५ तालुके व २ महानगरपालिका मिळून पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ८०३४६ व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४७५०२ असे एकूण १,२७,८४८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीच्या व इयत्ता सातवीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसविण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यात पूर्वमाध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा ३९६ केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी ३९४ केंद्र संचालक, ३४ उपेंद्रसंचालक, ३५६६ पर्यवेक्षक, ९९९ शिपाई, असे एकूण ४९९३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४२ केंद्रावर विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, त्यासाठी २४२ केंद्र संचालक, २५ उपकेंद्रसंचालक, २०६९ पर्यवेक्षक, ५९० परिचर अशा एकूण २९२८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरावरून १५ तालुके व दोन मनपा यांच्यासाठी जिल्हा मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण नियोजन केलेले असून, पालकांनी परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)