सभापतिपदी सावंत यांची फेरनिवड

By Admin | Updated: July 22, 2014 01:06 IST2014-07-22T00:06:58+5:302014-07-22T01:06:16+5:30

सभापतिपदी सावंत यांची फेरनिवड

Sawant's re-election as president | सभापतिपदी सावंत यांची फेरनिवड

सभापतिपदी सावंत यांची फेरनिवड

इगतपुरी पंचायत समिती : चिठ्ठी प्रक्रियेत झाला चमत्कारघोटी : इगतपुरी पंचायत समितीत रंगलेल्या अविश्वास ठराव नाट्यानंतर आज झालेल्या सभापती व उपसभापतिपद निवडणुकीच्या वेळी चमत्कार होऊन सभापतिपदाची माळ पुन्हा ठकूबाई सावंत यांच्याच गळ्यात पडली, तर उपसभापतिपदी रिपाइंच्या सविता जगताप यांची वर्णी लागली. आमदार गट व विरोधी गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
तहसीलदार महेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात निवडणूक घेण्यात आली. सभापतिपदासाठी ठकूबाई सावंत व जिजाबाई कौले यांनी तर उपसभापतिपदासाठी सविता जगताप व वैशाली सहाने व रमेश जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या वेळेत रमेश जाधव यांनी माघार घेतली मतदानात सभापतिपदासाठी दोघांनाही समान मते पडली. यावेळी चिठ्ठीव्दारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ठकूबाई सावंत यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली, तर उपसभापतिपदासाठीही चिठ्ठी पद्धतीने निवड करण्यात आली.
यात सविता जगताप यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना उपसभापती म्हणून जाहीर करण्यात आले. जिजाबाई कौले यांच्या गटाकडे गोपाळ लहांगे, पांडुरंग वारुंगसे, मुक्ता गोवर्धने, वैशाली सहाणे होते, तर ठकूबाई सावंत गटाकडे रमेश जाधव, हरिदास लोहकरे, लहानू हिंदोळे, सविता जगताप होते. या धक्कादायक निकालाने राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा होत होती. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Sawant's re-election as president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.