सावता माळी नगर ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST2021-01-08T04:41:22+5:302021-01-08T04:41:22+5:30

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या व बाजार समितीचे माजी उपसभापती उत्तमराव कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेत ...

Savta Mali Nagar Gram Panchayat unopposed | सावता माळी नगर ग्रामपंचायत बिनविरोध

सावता माळी नगर ग्रामपंचायत बिनविरोध

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या व बाजार समितीचे माजी उपसभापती उत्तमराव कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेत तो अंमलात आणला. प्रभाग १ मधून हिराबाई घोडेकर, दीपाली जाधव, कुंडलिक गायकवाड, प्रभाग २ मधून चित्रा सकट, लीला बोडके, प्रभाग ३ मधून शंकर मधे, गंगूबाई मेंगाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामस्थांनी एकत्रित येत गुलालाची उधळण करत बिनविरोध निवडलेल्या सदस्यांचा सत्कार केला.

यावेळी राजू गिते, बाळासाहेब गिते, बाजीराव कानडे, झुंबर जाधव, रामचंद्र सकट, रघुनाथ सकट, सुधाकर कानडे, यशवंत कानडे, वाल्मिक गाडेकर, पोपट घोडेकर, बबन घोडेकर, विलास कानडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

------------

सावता माळी नगर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर हात उंचावून जल्लोष करताना नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ. (०७ सिन्नर १)

070121/07nsk_11_07012021_13.jpg

०७ सिन्नर १

Web Title: Savta Mali Nagar Gram Panchayat unopposed