शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आयुष्य सावरण्यासाठी तूच मायबाप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:21 IST

जगभर फादर्स डे साजरा होत असताना, एकीकडे आई-वडिलांकडे हट्ट करून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणारी विविध वयोगटातील मुले, तर दुसरीकडे लहान वयात निधन, घटस्फोट, घर सोडून निघून जाणे आदी विविध कारणांमुळे मातृछत्र हरपलेल्या मुलांचा तितक्याच मायेने वडिलांकडून होणारा सांभाळ, संगोपन पहायला मिळते.

नाशिक : जगभर फादर्स डे साजरा होत असताना, एकीकडे आई-वडिलांकडे हट्ट करून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणारी विविध वयोगटातील मुले, तर दुसरीकडे लहान वयात निधन, घटस्फोट, घर सोडून निघून जाणे आदी विविध कारणांमुळे मातृछत्र हरपलेल्या मुलांचा तितक्याच मायेने वडिलांकडून होणारा सांभाळ, संगोपन पहायला मिळते. आईची कमतरता जाणवणार नाही इतक्या मायेने, आपुलकीने त्यांची काळजी घेणारे पालक अर्थार्जनाची भूमिका पार पाडतानाच प्रसंगी स्वयंपाक करणे, मुलांचा अभ्यास घेणे, त्यांच्या वाटचालीवर लक्ष ठेवणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे या गोष्टीही करताना दिसत आहेत. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला तरी आपल्या मुलांना प्राधान्य देत, त्यांच्यासाठी सगळे आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेऊन आणि तो तितक्याच आत्मीयतेने पूर्ण करण्यावर ही मंडळी भर देताना दिसतात. ‘फादर्स डे’ निमित्त अशा अनोख्या बापलेकरांच्या जगात डोकावण्याचा प्रयत्न वेगळीच अनुभूती देणारा ठरला.आई-बाबांच्या लग्नाला पंधरा वर्षं पूर्ण झाली आणि त्याच वर्षात माझ्या डोक्यावरचा मातृछत्राचा आधार हिरावला गेला. २०१५ मध्ये अचानक माझी आई आजारी पडली. दवाखान्यात दाखल केले मात्र उपचारांना यश आले नाही. आईचे निधन झाले. तेव्हापासून वडील हेच आई आणि वडील या दोन्ही भूमिका निभावत आहेत. द्वारका येथील एका खासगी कार्यालयात ते अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. बाबांसाठी मी आणि माझ्यासाठी बाबा असे आता आमचे घट्ट नाते तयार झाले आहे. बाप म्हणून ते माझी काळजी घेताना मुलगी म्हणून मलाही त्यांची काळजी घेताना आनंद वाटतो, समाधान वाटते. मी यंदा दहावीची परीक्षा दिली. चांगल्या गुणांनी ती पासही झाले. मी गाण्याच्या दोन परीक्षाही दिल्या आहेत. मला पुढे खूप शिकायचे आहे. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे आणि त्याद्वारे आईला ते यश समर्पित करणे हे माझे ध्येय आहे.  - अक्षदा कुलकर्णीगायक, वादक असे कलावंतांचे हसतेखेळते कुटुंब म्हणून आमच्या कुटुंबाची ओळख आहे. आईवडील दोघांनाही गायन, वादन, निवेदनाची आवड होती. याशिवाय आई टायपिंग संस्थाही चालवायची. १९९८ साली एका गंभीर आजाराने माझ्या आईचे निधन झाले. तेव्हा मी १८, तर लहान भाऊ केवळ १४ वर्षांचा होता. आईच्या पश्चात बाबा (श्याम पाळेकर) यांनी सगळे कुटुंब सावरले. ते बॉश कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. आईच्या पश्चात नोकरी, कलेची जोपासना, कौटुंबिक जबाबदाºया अशा सगळ्याच आघाड्या ते ताकदीने पेलत होते. स्वयंपाक येत असल्याने ते स्वयंपाकही करत होते. आम्हा मुलांच्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा भर असायचा. आज मी गायनासह ढोलकी, ढोलक वादन करतो. सांस्कृतिक क्षेत्रात जे काही थोडेबहुत नाव कमवून आहे ते दोघांच्या परिश्रमाचे फळ आहे. - अमोल पाळेकरआई, बाबा, भाऊ आणि मी असे आमचे चौकोनी कुटुंब सुखात नांदत असताना दहा वर्षांपूर्वी माझ्या आईचे निधन झाले. अचानक आजारी पडली. गंभीर आजाराचे निदान झाले. त्यामुळे आमचे संपूर्ण कुटुंबच हादरून गेले होते. त्यानंतर दवाखान्यात दाखल केले, अनेक प्रकारचे उपचार केले; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. हे दु:ख बाजूला ठेवत वडिलांनी (सुनील सोनजे) त्यांचे सारे लक्ष आम्हा दोघांवर केंद्रित केले. मुलांना वाढवायचे, शिकवायचे हा निर्धार करून ते कामाला लागले. आज मी पदवीचे शिक्षण घेते आहे, तर माझा भाऊ दहावीला आहे. माझे बाबा पूर्वी भाजीचा गाडा घेऊन शहरभर फिरायचे. आमच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता सतत काम केले. आता मात्र वय झाल्याने, पायदुखीमुळे एकाच ठिकाणी गाडी उभी करून भाजी विकतात. आईच्या पश्चात मुलांना चांगल्या रीतीने वाढवणारा बाप म्हणून त्यांचा साºयांनाच अभिमान वाटतो.  - अश्विनी सोनजेसाधारणत: आठ वर्षांपासून मी माझ्या वडिलांबरोबर राहतो. आई व वडील दोघेही एकत्र राहत नसले तरी आईची व माझी नियमित भेट होत असते. ती माझ्या अभ्यासाचा, खेळाचा, माझ्या प्रगतीचा आढावा घेत असते. माझ्या बाबांबरोबरचे माझे नाते पहिल्यापासून फार जिव्हाळ्याचे आहे. लहानपणापासून आईवडील दोघांनी मला प्रेमाने वाढवले, घडवले. पण गेल्या आठ वर्षांपासून माझ्या जडघडणीत पूर्णवेळ साथ देण्याचे श्रेय माझ्या वडिलांना जाते. ते प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. आज ते ‘प्रथम’ संस्थेत काम करत आहेत. मी सध्या बीकॉम करतो आहे आणि आंतरराष्टÑीय पातळीवर बॅडमिंटन खेळतो. माझ्या खेळात सातत्याने सुधारणा कशी होईल, स्पर्धा जिंकण्यात मी नेहमी यशस्वी कसा होईल याचा त्यांना ध्यास असतो.  - अमन फरोग संजय

टॅग्स :Nashikनाशिक