शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

वनविभागाचे 'रेस्क्यू ऑपरेशन' : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 13:26 IST

चाडेगाव शिवरस्ता सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यात अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देबिबट्या वारंवार बिथरत विहिरीत सैरावैरा पळत होताडरकाळ्यांमुळे बघ्यांच्या कपाळावरही घाम फुटला गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला

नाशिक : वेळ मध्यरात्रीची...ठिकाण चेहडी-चाडेगाव शिवरस्ता माऊलीनगर... सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यातील एका कठडे नसलेल्या धोकादायक विहिरीत तीन वर्षांचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना कोसळला. शुक्रवारी (दि.२४) सकाळी शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता विहिरीत बिबट्या बसलेला आढळला. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाल कळविण्यात आली अन् सकाळी साडे सात वाजेपासून सुरू झाले ‘मिशन रेस्क्यू’ आणि दहा वाजता बचावकार्य यशस्वीपणे पुर्ण झाले.दारणाकाठालगत मागील दोन महिन्यांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. या वीस दिवसांत एकूण चार बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.

सोमवारी (दि.२१) पळसे गावात लावलेल्या पिंज-यात बिबट्याची एक लहान मादी जेरबंद झाली होती. या मादीचीही रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत तीन बिबटे या उद्यानात मागील पंधरा दिवसांत पाठविले गेले आहे. तीन दिवसांचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा चाडेगाव शिवारातील अरिंगळे मळ्याच्या विहिरीत बिबट्या पडल्याने वनविभागाच्या रेस्क्यू पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल भालेराव, मधुकर गोसावी, वनरक्षक उत्तम पाटील, गोविंद पंढरे, राजेंद्र ठाकरे पेठ वनपरिक्षेत्राचे मोबाईल दक्षता पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पिंजरा, दोरखंड, जाळी, संरक्षक ढाली आदि साधनसामुग्री घेऊन चालक प्रवीण राठोड यांनी वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी पोहचविली. तत्काळ वाहनातून वनरक्षकांनी दोरखंड बांधून पिंजरा विहिरीत उतरविला आणि अवघ्या पाच मिनिटांत बिबट्याने विहिरीमधील एका बाजुने थेट पिंज-याच्या द्वाराजवळ उडी घेतली मात्र यावेळी बिबट्या पाण्यात पडला. वनरक्षकांनी पिंजरा अजून थोडा खाली सोडल्यानंतर बिबट्याने पोहत पिंजºयात प्रवेश केला अन् पिंज-याची झडप बंद झाली. तत्काळ एका स्थानिक तरूणाने थेट विहिरीत धरून ठेवलेल्या पिंजºयावर चढत दरवाजाला कुलूप ठोकले. पिंज-याच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आले. विहिरीतून पिंजरा बाहेर काढताच जमलेल्या शेकडो गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. विहिरीच्या चौहोबाजूला दाट ऊसशेती असल्याने या भागात बिबट्यांचा वावर असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
बिबट्याला बघण्यासाठी अरिंगळे मळा परिसरात जणू जत्राच भरली होती. बघ्यांच्या गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आणि बचाव कार्य दोन ते अडीच तासापर्यंत लांबले. बघ्यांचा आवाज अन् गोंगाटाने बिबट्या वारंवार बिथरत विहिरीत सैरावैरा पळत होता. अनेकदा त्याने डरकाळ्याही फोडल्या. डरकाळ्यांमुळे जमलेल्या बघ्यांच्या कपाळावरही घाम फुटला होता.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव