शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

सवर्णांचे आरक्षणही फसवे - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:54 IST

भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

नाशिक : भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.गोल्फ क्लब मैदान येथे वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, सरकारचे प्रयत्न चाललेत की, दंगल घडवून आणावी परंतु ते जमले नाही. शहरी नक्षलवाद वाढतोय म्हणून सांगितले, तेही शक्य झाले नाही. भीमा कोरेगाव करून पाहिले तेथेही काही झाले नाही. तिहेरी तलाक कायदा आणला. यामुळे मुस्लीम समाज उठाव करेल, असे त्यांना अपेक्षित होते; परंतु हेही झाले नाही. यानुसारच आर्थिक निकषांवरील दहा टक्के आरक्षण आले, परंतु त्यांची खेळी त्यांच्यावरच उलटली असल्याचे ते म्हणाले. दहा टक्के आरक्षण द्यायचे हा भाजपाचा गेम प्लॅन होता, असा आरोप करताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, राज्यसभेत जेथे भाजपाचे बहुमत नाही तेथे हा प्रस्ताव फेटाळला जाईल आणि निवडणुकीत भाजपाला नवा मुद्दा मिळेल, या अपेक्षेने त्यांनी घटनादुरुस्तीचे विधेयक आणले, मात्र तेही मंजूर झाल्याने भाजपाची परिस्थिती ‘आ बैल मुझे मार’ अशी स्थिती झाल्याचे आंबेडकर म्हणाले. आरक्षण जाहीर करताना १ हजार फुटाचे घर आणि ८ लाखांच्या आत उत्पन्न या निकषात सवर्ण बसत नसल्याने त्याचा फायदा हा मुस्लिमांनाच अधिक होणार असल्याने आगामी निवडणुकीत सवर्ण भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे आंबेडकर म्हणाले.आंबेडकर यांनी मोदी यांच्या धोरणावर टीका करताना भाजपामुळेच देशाची अवस्था बिघडल्याचा आरोप केला. या अगोदरच्या सरकारने रिझर्व्ह बॅँकेच्या गंगाजळीला हात लावला नव्हता. परंतु मोदी सरकार गंगाजळीला हात लावायला निघाले आहे. बॅँकेत ज्यांचे खाते आणि फिक्स डिपॉझिट आहे त्यांच्यासाठी ही गंगाजळी ही सुरक्षित व्यवस्था असते, ही व्यवस्थाच भाजपा मोडीत काढायला निघाले आहे. जीएसटी, नोटाबंदीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था मोडकळीत आली आहे.देशाला हिंदू धर्म आणि हिंदू राष्टÑ करण्याच्या नादात बिघडवू नका, असा सल्ला देतानाच पंतप्रधान, चीफ जस्टीस, राष्टÑपती, तीनही आर्मी चीफ हे धर्म कधीही सांगत नाही. पण ते हिंदूच असतात अशी परिस्थिती आजची आहे. देशाचा धर्म हिंदू असावा, असे सांगणारेच देश बुडवायला निघाले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.बहुजन आघाडीने महाराष्टÑाचे राजकारण हादरलेराज्यभर होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या लाखोंच्या सभांमुळे महाराष्टÑाचे राजकारण हादरले असून, ही आघाडी तोडण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केले जात आहेत, असा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला. 

टॅग्स :Politicsराजकारणreservationआरक्षणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर