सावरकरांचा वैचारिक वारसा जपणे गरजेचे विवेक घळसासी : सावरकर जयंतीनिमित्त व्याख्यान
By Admin | Updated: May 31, 2014 01:07 IST2014-05-31T00:14:15+5:302014-05-31T01:07:54+5:30
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा जतन करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे तरच विकासान्मुख भारत, वैज्ञानिक भारत, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण भारत घडेल, असे विचार विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.

सावरकरांचा वैचारिक वारसा जपणे गरजेचे विवेक घळसासी : सावरकर जयंतीनिमित्त व्याख्यान
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा जतन करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे तरच विकासान्मुख भारत, वैज्ञानिक भारत, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण भारत घडेल, असे विचार विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने शहर भाजपाच्या वतीने वसंत स्मृती येथे घळसासी यांचे व्याख्यान संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी ही भारत देशाविषयीची अत्युच्च प्रेम निर्माण करणारी होती. त्यांच्या विचारसरणीला स्मरून देशातील घराघरांमध्ये तरुणांमध्ये देशप्रेम वाढीस लागले पाहिजे, असे सांगून घळसासी म्हणाले की, सामाजिक ऐक्य, भविष्यातील आव्हाने, पेलण्याची ताकद सावरकरांच्या विचारसरणीत होती. स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न बघण्यासाठी सावरकरांच्या विचारांची ज्योत सतत तेवत ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश दीक्षित यांनी केले. महेश सदावर्ते यांनी आभार मानले. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष विजय साने, माजी महापौर बाळासाहेब सानप, सुरेश पाटील, गटनेता संभाजी मोरुस्कर, पूर्व प्रभाग सभापती कुणाल वाघ, प्रा. परशराम वाघेरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
..छायाचित्र... आरच्या फोटोवर बीजेपी सावरकर, सावरकर वन नावाने सेव्ह आहे.