हिंदू तिथीनुसार प्रथमच सावरकर जयंती साजरी
By Admin | Updated: May 22, 2014 00:15 IST2014-05-21T23:55:09+5:302014-05-22T00:15:56+5:30
नाशिक : शहरात विविध संस्थांच्या पुढाकाराने प्रथमच हिंदू तिथीनुसार वीर सावरकरांची जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी यापुढे वैशाख कृष्ण षष्ठीला सावरकरांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदू तिथीनुसार प्रथमच सावरकर जयंती साजरी
नाशिक : शहरात विविध संस्थांच्या पुढाकाराने प्रथमच हिंदू तिथीनुसार वीर सावरकरांची जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी यापुढे वैशाख कृष्ण षष्ठीला सावरकरांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्या सावरकरांची जयंती हिंदू तिथीनुसारच साजरी केली जावी, यासाठी इतिहासाचे अभ्यासक नंदन रहाणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार त्यांनी शहरातील संस्थांना आवाहन केले होते. त्यानुसार प्रथमच ठिकठिकाणी हिंदू तिथीनुसार सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. भगूर येथे सावरकरांच्या जन्मस्थानी सावरकर जन्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने मृत्यंुजय कापसे, सुनील जाधव, विलास कुलकर्णी, कैलास गायकवाड, संजय जाधव यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. द्वारका परिसरातील काठेगल्ली चौकात ज्येष्ठ कार्यकर्ते सदूभाऊ वालझाडे व कीर्तीश जोशी यांनी सावरकर साहित्याचे पूजन केले. यावेळी मनोहर साठे, लक्ष्मीकांत जोशी, डॉ. विशाल वाघचौरे, बजरंग दलाचे सतीश हाके, राहुल सोनकुळ, साई पतंगे, नारायण निकम, संजय कुलकर्णी आदि उपस्थित होते. मध्य नाशिकमधील ऐतिहासिक अभिनव भारत स्मारक मंदिरात भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, शिवसेना उपमहानगरप्रमुख नीलेश कुलकर्णी, नगरसेवक शाहू खैरे, हिंदू एकता आंदोलनाचे रामसिंग बावरी यांनी भगूरचे जन्मस्थान व अंदमानातील कारागृहातून आणलेल्या पवित्र मातीचे पूजन केले. यावेळी संजय काशीकर, स्वानंद कुलकर्णी, जयवंत गद्रे, विष्णू बागुल, नितीन काथवटे आदि उपस्थित होते. रविवार कारंजा येथे भूषण रुईकर, मनीष रेवर, नारायण चुंबळे, महेश बडवे, जयेश परमार, दीपक कपिले, स्वप्नील गिते यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. पंचवटी कारंजावर परशुराम जयंती उत्सव समितीचे शिवाजी पालकर, सचिन पाडेकर, राहुल केंगे, रोहित मुळे, अनंत कोरडे, भूषण पाठक, चंद्रशेखर पंचाक्षरी, किरण पाटील यांनी सावरकर व शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
विसंगती दूर व्हावी
सावरकरांचा जन्म १३१ वर्षांपूर्वी भगूर येथे वैशाख कृष्ण षष्ठीला झाला. सावरकरांनी आयुष्यभर हिंदुत्व रक्षणाचा ध्यास घेतला व हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगला. मात्र त्यांची जयंती व पुण्यतिथी पाश्चिमात्य कालगणनेतल्या तारखांनुसार केली जाते. त्यांच्या शिकवणुकीशी विसंगत असा हा प्रघात आहे. ही विसंगती दूर व्हावी व हिंदू तिथीप्रमाणेच त्यांची जयंती साजरी केली जावी, यासाठीच हे अभियान राबविले जाणार आहे.
- नंदन रहाणे, इतिहास अभ्यासक