शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आत्मसमर्पण दिनानिमित्त सावरकर यांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:31 IST

क्रांतिकारकाचे मेरोमणी भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर शहर व नाशिक तसेच महाराष्ट्रातून आलेल्या विविध संस्था मान्यवरांनी सावरकर स्मारकात अभिवादन केले.

भगूर : क्रांतिकारकाचे मेरोमणी भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर शहर व नाशिक तसेच महाराष्ट्रातून आलेल्या विविध संस्था मान्यवरांनी सावरकर स्मारकात अभिवादन केले. सकाळी सावरकर स्मारकात पुरातत्व विभागातर्फे सहायक अधिकारी जया वाहने यांच्या हस्ते सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सचिन पगारे, कृष्णा बालपांडे, विजयकुमार धुमाळ, किशोर बच्छाव, सोमनाथ बोराडेसह पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालिका सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष अनिता करंजकर व मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यालयीन अधीक्षक रमेश राठोड, अधिकारी नगरसेविका नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.भगुरपुत्र, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा ५३वा आत्मसमर्पण दिनानिमित्त वीरसावरकर उत्सव समिती, सावरकर फेसबुक संघ, विविध संघटना व मित्रमंडळांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.सकाळी १० वाजता सावरकर फेसबुक संघाचे वतीने जन्म स्मारकात भगूर नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे यांच्या हस्ते सावरकर जीवनावरील आधारित माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली, तर शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ३५ सावरकर भक्तांनी रक्तदान केले.भोसलाच्या बॅण्ड पथकाची भगूर येथे मानवंदनानाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या ३६८ विद्यार्थ्यांनी भगूरच्या शिवाजी चौकात बँंड पथकाच्या तालावर स्वा. सावरकरांना मानवंदना दिली. नाशिक येथील बागेश्री वाद्यवृंद चारुदत्त दीक्षित निर्मित यांनी सकाळी सावरकर स्मारकात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. शिक्षण मंडळ भगूर नूतन प्राथमिक व उच्च माध्यमिक च्या विद्यार्थांनी सावरकरांच्या जीवनावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी हसानंद नेहलाणी, मधुसुदन गायकावड, रमेश शेटे, अशोक बोराडे, दिलीप काकडे, रामदास आंबेकर, जितेंद्र भावसार, चंद्रशेखर कोरडे, मृत्युंजय कापसे तसेच अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, नूतन प्राथमिक विद्यामंदिर, ति. झा. विद्यामंदीर शाळेतील विद्यार्थ्यांनीही स्मारकात जाऊन अभिवादन करत नतमस्तक झाले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक