सावतानगरला कॉँक्रीटचा रस्ता फोडला

By Admin | Updated: September 16, 2016 23:56 IST2016-09-16T23:56:19+5:302016-09-16T23:56:32+5:30

सावतानगरला कॉँक्रीटचा रस्ता फोडला

Savantagara busted the road of concrete | सावतानगरला कॉँक्रीटचा रस्ता फोडला

सावतानगरला कॉँक्रीटचा रस्ता फोडला

 सिडको : सावतानगर-रायगड चौक येथे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेला काँक्रीटचा रस्ता मनपाची कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आला असल्याने याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक ४७चे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या प्रभागातून सावतानगर, रायगड चौक येथे मनपाने काँक्रीटचा रस्ता तयार केला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता आज एका सोसायटीत पाणीपुरवठ्याची लाइन घेण्यासाठी प्लंबरने रस्ता फोडला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी मनपाच्या बांधकाम अथवा इतर कोणत्याही विभागाची परवानगी न घेताच रस्ता खोदला याबाबत प्रभागाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पाहणी केली. पाणीपुरवठा अधिकारी संजय बच्छाव यांनी तत्काळ दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (वार्ताहर)

Web Title: Savantagara busted the road of concrete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.